चांदिवली येथे डॉ.राममनोहर त्रिपाठी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
मुंबई
२५ जानेवारी :-
दिवंगत डॉ.राम मनोहर त्रिपाठी, साहित्यिक, तडफदार राजकारणी आणि व्यासंगी पत्रकार यांची जयंती आज राम मनोहर त्रिपाठी फाऊंडेशनचे अध्यक्ष व माजी मंत्री मो आरिफ नसीम खान यांनी असल्फा येथील डॉ.राम मनोहर त्रिपाठी सभागृहात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली.
पुष्पहार अर्पण केल्यानंतर स्थानिकांना मोफत नेत्र चिकित्सा व मोफत चष्मा वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो लोकांनी त्याचा लाभ घेतला.
याप्रसंगी स्वर्गीय डॉ. राम मनोहर त्रिपाठी यांचे सुपुत्र ज्येष्ठ पत्रकार अनुराग त्रिपाठी, रामलीला महोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील दुबे, मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष शरीफ खान, महासचिव प्रभाकर जावकर, भरत सिंह, विद्यापती राय, अनिल चौरसिया, नफीस खान, विद्रोही महाराज, चंद्रभान चौबे, विनोद सिंग , राजू श्रीवास्तव , जगदीश मिश्रा , सुनील सिंग , बल्ले सिंग , गणेश चव्हाण , माया खोत , प्रदीप शहा , जमाल खान , हैदर अली शेख , अशोक पोळ , सईद खान , कमल जोशी , अस्लम खान , नितीन पवार , रामभाऊ गजकोश , मनोज तिवारी, कमलुद्दीन अन्सारी, अशोक दुबे, विनोद पांडे, पांडुरंग दरवेश, अजय सिंग, इरफान खान, राकेश सिंग, आरजू रिझवी, रामविलास पाठक, सूरज गिरी, प्रभात शाहू, हुसेन, महिलांमध्ये दमयंती ठक्कर, वनिता मुळीक, रिता सिंग, सीता दुबे, राधिका पवार, मीना भालेराव, रुक्साना खान, भारती जैस्वाल यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते.