महाराष्ट्रमुंबई

कांद्याचा दर झाला दुप्पट , आणखी दर वाढण्याची शक्यता

कांद्याचा दर झाला दुप्पट , आणखी दर वाढण्याची शक्यता

नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कांद्याचे दर दुप्पट झाले आहेत. आधीचा दर हा 10 ते 12 रुपये होते मात्र तेच दर 20 ते 25 रुपयांपर्यंत पोहचले आहेत. अवकाळी पावसामुळे नवीन पीक खराब झाल्याने नवीन कांदा बाजारात येऊ शकला नाही, त्यात जूने कांदे हे जवळपास संपले आहेत, त्यामुळे याचा थेट परिणाम कांद्याच्या दरांवर झाला असून, त्यात नवीन पीक यायला अजून एक ते दीड महिना जाऊ शकतो त्यामुळे दर अजून वाढण्याची शक्यता व्यापारी करत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आधीच महागाईची झळ पोहचली असताना कांदा अजून रडवताना दिसत आहे. त्यात बाजारात नवीन पीक येईपर्यंत अजून किती दर वाढतात हे पाहणे ही महत्वाचे आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button