मालाड मध्ये राजनेत्या विरोधात एक दिवसीय उपोषण
मालाड मध्ये राजनेत्या विरोधात एक दिवसीय उपोषण
मालाड (पूर्व), कुरार व्हीलेज, एस.बी.आय. बैंक ते संतोषी माता मंदिर पर्यंत नवीन मलनि:सारण वाहिनी टाकण्याचे कामा मध्ये वारंवार राजकीय पक्ष तसेच महाननगरपालिका तर्फे अडथडा निर्माण करून लोकांचा हिताचे काम बंद करणाऱ्या राजनेता आणि अधिकाऱ्यांचा विरोधात एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल असा इशारा भाजपा पक्षनेते नगरसेवक विनोद मिश्रा यांनी सहाय्यक आयुक्त पी / उत्तर विभाग यांना लेखी पत्राद्वारे दिले आहे. तसेच त्याची प्रत महापालिका आयुक्तांना दिलेली आहे.
दिंडोशी मतदार संघ, प्रभाग क्र.- ४३ मध्ये एस.बी. आय. बैंक ते संतोषी माता मंदिर पर्यंत नवीन मलनि:सारण वाहिनी टाकण्याचे काम २०१९ मध्ये विनोद मिश्रा यांच्या प्रयत्नाने महानगरपालिकेतर्फे चालू करण्यात आले. काम चालू झाल्यानंतर विविध राजकिय पक्ष शिवसेना (श्री. उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी कॉग्रेस, काँग्रेस तर्फे काम बंद करण्यात आले. पुन्हा काम चालू करण्याकरीता मनपा, राजकीय पक्ष आणि पोलीस अधिकाऱ्यां सोबत नर्मदा हॉल मध्ये चर्चा करण्यात आली. त्यानंतर काम चालू करण्यात आले. मान्सूनमुळे परत काम बंद करण्यात आले. मानसून संपल्याने ठेकेदारानी उर्वरित काम चालू करण्याचे सांगितले सर्व परवानगी घेण्यात आली. त्यानंतर दिनांक १६/१२/२०२२ रोजी रात्री ११ वा. मलनिःसारण वाहिनी टाकण्याच्या कामाची सुरूवात करण्यात आली. काम चालू केल्यानंतर पुन्हा विविध राजकिय पक्ष शिवसेना (श्री. उदृष्व ठाकरे गट), राष्ट्रवादी कॉग्रेस, कॉंग्रेस यांचाकडून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारस काम करण्यास मनाई केली व कामही बंद केले. लोकांचे हिताचे काम शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस पक्षातर्फे बंद करण्यात आले असून मंगळवार, दिनांक २०/१२/२०२२ रोजी सकाळी १०.३० वा. काम बंद करणाऱ्या पक्ष व महानगरपपालिकेच्या अधिकाऱ्यांचा विरोधात रमेश हॉटेल समोर, टेक्सी स्टैण्ड जवळ एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल असे यांनी या पत्रात म्हटले आहे.