बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

श्री बैद्यनाथधाम येथे आयोजित महासभेच्या राष्ट्रीय अधिवेशनातील पहिल्या दिवशी पार पडले

श्री बैद्यनाथधाम येथे आयोजित महासभेच्या राष्ट्रीय अधिवेशनातील पहिल्या दिवशी पार पडले

अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी व कार्यसमितीचे अधिवेशन देवघर बैद्यनाथ धाम, झारखंडमध्ये सुरू झाले आहे. अधिवेशनाचा शुभारंभ माजी मंत्री कृष्णानंद झा यांनी दीपप्रज्वलन करून केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश पाठक चतुर्वेदी होते. अधिवेशन आयोजक व स्थानिक समिति पंडा, श्री धर्म रक्षिणी सभेचे अध्यक्ष प्रो. डॉ, सुरेश भारद्वाज यांनी स्वागतीय भाषण केले. सूत्रसंचालन महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नवीन नागर यांनी केले. अधिवेशनाला प्रयागराज, काशी, मथुरा, कुरुक्षेत्र, वृंदावन, हरिद्वार, उज्जैन, राजगिरी, सोमनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी, अयोध्या, मिश्रिख, नैमिशारण्य, बिठूर, औरंगाबाद, नाशिक, त्रंबकेश्वर, रामेश्वरम, जम्मू काश्मीर, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, गया, बासुकीनाथ, पुष्कर, कांचीकामकोट पीठ, पनकी, कानपुर, कांगडा, ज्वलादेवी आदी प्रमुख तीर्थक्षेत्रातून सुमारे 600 पुरोहित उपस्थित होते.
पहिल्या दिवशी प्रमुख मान्यवरांनी देशभरातून आलेल्या पुरोहितांचे आशीर्वाद घेतले व अधिवेशनाची प्रशंसा केली. त्यानंतर वरिष्ठ उपाध्यक्ष द्वय सतीश शुक्ला (नाशिक), रामकृष्ण तिवारी (प्रयाग), अतिरिक्त प्रभारी वरिष्ठ महामंत्री कन्हैय्या त्रिपाठी (काशी) तसेच पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष पं. प्रकाश मिश्र यांनी संबोधित केले. राष्ट्रीय अध्यक्ष महेश पाठक यांनी सर्वांचे आभार मानत पहिल्या सत्राची सांगता केली.
युवा संगठन मंत्री विनोद चतुर्वेदीच्य मंगलाचरणाने सायंकाळी 4 वाजता दुसर्‍या सत्राची सुरूवात झाली. त्यानंतर महासभेच्या युवा प्रमुख पदाधिकार्‍यांनी संगठनेचा विस्तार आणि प्रगतीचा आढावा घेत विचार व सूचना मांडल्या. तदनंतर महामंत्री चंद्रकांत चकहा मधू (प्रयागराज), रामनाथ तिवारी (काशी विशालाक्षी मंदिर), स्वामी मुरलीधरन (कांचीकामकोट पीठ) व पनकी हनुमान मंदिरचे श्री महंत यांनी आपले विचार मांडले. सायंकाळी 7 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाला सुुरुवात झाली. व दुसर्‍या दिवशी 10 वाजताच्या सत्र प्रारंभाची घोषणा करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button