औरंगाबादमहाराष्ट्र
Trending

वाळुज गावात पुजाऱ्याच्या बंद खोलीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ

वाळुज गावात पुजाऱ्याच्या बंद खोलीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ

वाळुज गावातील समता नगर कॉलनी येथे भाडेतत्त्वावर राहणाऱ्या पुजाऱ्याच्या बंद असलेल्या खोलीत किचन च्या ओट्यात गाडलेल्या अवस्थेत कुजलेला मृतदेह आढळल्याने वाळूज गावात मोठी खळबळ उडाली आहे

वाळूज येथील समता कॉलनीत सूर्यकांत शेळके यांचे दुमजली घर आहे या घराच्या दोन खोल्यांमध्ये भाडेतत्त्वावर काकासाहेब नामदेव भुईगड हा पत्नी व दोन मुलीसह राहत होता गेल्या तीन महिन्यापासून घरमालकाच्या अनुपस्थितीत खोलीला टाळे लावून तो गावाकडे गेला होता खोलीचे भाडे थकलेले असल्याने घरमालक शेळके यांनी भुईगड यांना फोन करण्याचा प्रयत्न केला होता मात्र वारंवार फोन करूनही काकासाहेब भुईगड हे फोन उचलत नसल्याने दुसऱ्या भाडेकरूंना खोली भाड्याने देण्यासाठी खोलीला लावलेले टाळे बुधवारी घरमालक सूर्यकांत शेळके यांनी तोडले असता खोलीमध्ये डोकावून पाहताना किचन ओट्यावर दोन शेंदूर फासलेले दगड तसेच काही पुजलेले लिंबू त्यांच्या निदर्शनास आले तसेच किचन ओट्याखालील जागा बांधकाम केलेली दिसली यावेळी त्यांनी कुदळ आणि फावड्याच्या सहाय्याने बांधकाम केलेला किचन ओटा खोदण्यास सुरुवात केली असता दुर्गंधी येत असल्याने आणि काहीतरी गाडलेले असल्याचे निदर्शनास आल्याने या धक्कादायक प्रकाराची माहिती त्यांनी तात्काळ वाळूज पोलिसांना कळवली दरम्यान वाळूज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत किचन ओट्याखालील बांधकाम केलेला भाग कुदळ आणि फावड्याच्या साह्याने पोखरून पाहणी केली असता कुजलेल्या अवस्थेत 22 ते 23 वर्षीय वयोगटाचा अनोळखी मृतदेह आढळून आला मृतदेह पुढील तपासणीसाठी शासकीय रुग्णालय घाटी येथे रवाना करण्यात आला असून अधिक चौकशी करिता काकासाहेब भुईगड राहत असलेल्या फुलंब्री तालुक्यातील धानोरा गावात पोलिसांनी पथकं रवाना केली असून भुईगड यांना ताब्यात घेतल्यानंतच सत्य काय तो प्रकार समोर येणार आहे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button