बातम्यामहाराष्ट्रमुंबई
नवी मुंबई जीएसटी विभागाकडून भ्रष्टाचार मुक्त अभियान आठवडा
नवी मुंबई जीएसटी विभागाकडून भ्रष्टाचार मुक्त अभियान आठवडा
केंद्रीय वस्तू व सेवा कर आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने भ्रष्टाचार मुक्त भारत आभियान सुरू केले आहे. हे अभियान 6 नोव्हेंबर पर्यंत चालणार असून यात पथनाट्य सादर करून नागरिकांना आवाहन केले जात आहे. यातून देशाला भ्रष्टाचार किती घातक आहे, हे संपले हवे यातूनच देशाचे हित असल्याचे या पथनाट्यातून सांगितलें जात आहे. तर नवी मुंबई जीएसटी आयुक्त प्रभात कुमार यांनी देशातून भ्रष्टाचार संपला हवा, असे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे. त्यामूळे आम्ही हा पूर्ण आठवडा भ्रष्टाचारमुक्त अभियान आठवडा म्हणून राबवत आहोत, असे सांगितले.