बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

अमेरिकेच्या दहशतवाद पूरक भूमिकेविरोधात मुंबईत जन आंदोलन

अमेरिकन उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मागणी

मुंबई /श्रीश उपाध्याय
———————————-
: अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन यांनी ८ सप्टेंबर २०२२ रोजी पाकिस्तानला F-16 या लढाऊ विमानांसाठी 45 कोटी डॉलर (3651 कोटी रुपये) ची आर्थिक मदत करण्याच्या दहशतवाद पुरस्कृत निर्णयाला विरोध करून भारतीय बाजारपेठेतील अमेरिकन वस्तूंवर बंदी घालण्यात यावी या मागणीसाठी विर योध्दा संघटनेने केली आहे. येत्या २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता अमेरिकेच्या या भूमिकेविरोधात मुंबईतील आझाद मैदान येथे मोठे जन आंदोलन पुकारण्यात आले आहे अशी माहिती वीर योद्धा संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रमुख श्रीकांत रांजनकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पत्रव्यवहार करून संघटनेने अमेरिकेच्या या दहशतवाद पुरस्कृत भूमिकेबाबत तीव्र संताप व्यक्त करीत अमेरिकन वस्तूंवर बंदी घालावी अशी मागणी केली असल्याचे रांजनकर यांनी सांगितले.

रांजनकर यांनी प्रसिध्दी पत्रकार पुढे म्हटले आहे की, जगभरातील दहशतवाद आणि पाकिस्तान यांचा थेट संबंध असल्यामुळे 9/11, 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यांनी सिध्द झाले आहे शिवाय हे तेच F16 विमान आहे ज्याच्या मदतीने पाकिस्तानने बालाघाट हवाई हल्ला घडवून आणला होता. अशा परिस्थितीत F16 सारख्या लढाऊ विमानासाठी आर्थिक पाठबळ देऊन अमेरिका थेट दहशतवादाला खतपाणी घालत असल्याची आमची भावना झाली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिका पाकिस्तानच्या या डील वर तीव्र आक्षेप नोंदविला आहे. यावर अमेरिकेचे सहाय्यक संरक्षण मंत्री एली रैटनर म्हणतात की , पाकिस्तानला मदत ही अमेरिकेच्या फायद्यासाठी केली आहे. यात भारताचा काहीही संबंध नाही .

दोन देशांना आपसात लढवून सतचे होत साधण्याचा पश्चिमात्य देशांचा पूर्व इतिहास राहिलेला आहे. अमेरिका स्वतःचे शस्त्र विकण्यासाठी अशा पद्धतीने व्यवहार करत आहे हे निंदनीय आहे अमेरिका आपल्या वस्तू जगभरात विकून त्याद्वारे मोठ्या प्रमाणात आर्थिक काय करतो. तशीच कमाई अमेरिका आपल्या वस्तू भारतीय बाजारपेठेत विकून त्यातून मिळणाऱ्या पैश्याचा उपयोग पाकिस्तान सारख्या दहशतवाद पोसणाऱ्या देशाला मदत करण्यासाठी करीत असेल तर भारतासाठी सीमेवर अहोरात्र लढणाऱ्या सैनिक आणि देशासाठी बलिदान दिलेल्या शहीदांचा एकप्रकारे तो अपमान आहे. तसेच नुकताच वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्राच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या कणखर आर्थिक भूमिकेवर जो काही आक्षेप नोंदविला आहे तो सुद्धा निंदनीय आहे. तसेच ही जाहिरात म्हणजे समस्त भारतीयांचा अपमान आहे. या अशा अमेरिकेच्या स्वार्थी भूमिकेला आक्रमकपणे विरोध करीत भारतीय जनतेची भूमिका मंडळाने गरजेचे आहे.

वरील सर्व घटना आणि समस्त भारतीयांच्या भावना लक्षात घेता आपण अमेरिकेतील ज्या वस्तू बाजारपेठेत विकल्या जात आहेत त्या सर्व वस्तूंवर बंदी घालावी अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. तसेच अमेरिकेने पाकिस्तान बाबत स्वार्थासाठी घेतलेल्या अर्थपूर्ण घेतलेल्या भूमिकेचा आपण भारतीय व हिंदू राष्ट्र म्हणून निषेध करीत असून या भूमिकेच्या विरोधात संपूर्ण राज्यभरातून अमेरिकेच्या वस्तूंवर बहिष्कार घालावा यासाठी मोठे जन आंदोलन पुकारले आहे. येत्या 29 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे हजारोंच्या उपस्थितीत हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात अनेक राष्ट्रवादी विचारांच्या संघटना सहभागी होणार आहे असे रांजनकर यांनी आपली भूमिका आक्रमकपणे मांडत स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button