विरोधक टीका करत आहेत, आम्ही टीकेला कामाने उत्तर देऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विरोधक टीका करत आहेत, आम्ही टीकेला कामाने उत्तर देऊ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे जाऊन चेकपोस्टवर पोलिसांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. त्यासाठी नागपूर विमानतळावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मी गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री असतानाही दरवर्षी पोलिसांसोबत दिवाळी साजरी करीत होतो. आता मुख्यमंत्री आहे तरीही त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणार आहे. त्यांच्यासोबत आनंद वाटून घेण्यासाठी मी भामरागडला जात आहे. पोलिसांचे मनोबल वाढल्याने गडचिरोलीमध्ये नक्षलवाद कमी होत चालला आहे.नाना पटोले यांनी राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे. याबाबत विचारले असता मुख्यमंत्री शिंदे हसले आणि म्हणाले, पटोलेंची मागणी हास्यास्पद आहे. कारण आज राज्यात बहुमताचे, भक्कम पाठींबा असलेले सरकार स्थापन झाले आहे. तीन महिन्यांत आम्ही ७२ मोठे निर्णय घेतले. ग्रामपंचायत निवडणूकीत भापजप ३९७ जागांवर तर आमच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने २४३ ग्रामपंचायतींवीर सरपंच निवडून आणले आहे. आताही इतर सरपंच येऊन भेटत आहेत. आकडा वाढतो आहे. त्यामुळे विरोधकांना धडकी भरली आहे. विरोधी पक्ष टिका करतात, ते त्यांचे कामच आहे. पण आम्ही टिकेला टीकेने नव्हे तर कामाने उत्तर देऊ, असे ते म्हणाले.
BYTE : एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री