बातम्यामहाराष्ट्र
Trending

खडकदेवळा खुर्द येथे हिस्त्र प्राण्याने केल्या पाच शेळ्या फस्त…. आजीबाईवर दिवाळी ची रात्र ठरली काळरात्र….

खडकदेवळा खुर्द येथे हिस्त्र प्राण्याने केल्या पाच शेळ्या फस्त.... आजीबाईवर दिवाळी ची रात्र ठरली काळरात्र....

पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा खुर्द येथील गुनाबाई लक्ष्मण तेली व मथाबाई सुपडू तेली यांच्या मालकीच्या खडक देवळा खुर्द येथील हिवरा माध्यम प्रकल्प लगत शेतात दोन्ही आजीबाई वास्तव्यास होत्या.सकाळी अचानकपणे घराबाहेर बांधलेल्या पाच शेळ्यांवर हिस्त्र प्राण्याने हल्ला चढवून तब्बल पाच शेळ्या फस्त केल्याने आजीबाईंचे ऐन पाच शेळ्या फस्त केल्याने दिवाळीत त्यांच्यावर मोठे अर्थिक संकट कोसळले आहे.

आज सकाळ च्या सुमारास आजीबाई उठल्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला होता. सदर ठिकाणी पाच शेळ्या हिस्त्र प्राण्यांनी अंदाजीत रक्कम 30 ते 40 हजार रुपये किंमतीच्या शेळ्या फस्त केल्याची घटना घडली आहे. दोन्ही वयवृध्द आजीबाईंच्या उदरनिर्वाह चे साधन कुकुट पालन व शेळीपालन होते परंतु आज झालेल्या घटनेने पाच शेळ्या या हिस्त्र प्राण्याने फस्त केल्याने आजीबाईंचे उपजिविकेचे साधन हिरावून घेतले आहे त्यामुळे येणे दिवाळीत आजीबाईंना मोठे संकट कोसळले आहे आता कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न आजीबाईंना पडला आहे दिवाळी सारखा सण आजीबाईंच्या नुकसानीमुळे दिवाळीची रात्र ही काळ रात्र ठरली आहे घटनास्थळी पाच शेड्या हिस्त्र प्राण्याने फस्त केल्याने दोन्ही वयवृध्द आजीबाई ढसाढसा रडू लागल्या व घडलेल्या घटनेची माहिती देऊ लागल्या येणे दिवाळीत त्यांच्यावर कोसळलेले संकट परिसरात हळद व्यक्त होत आहे आजीबाईंनी गोळा केलेल्या पैशाने शेळीपालन सुरू केले होते त्यात या शेळ्या हिस्त्र प्राण्याने फस्त केल्याने मोठे संकट कोसळले आहे.

घटनेची माहिती मिळताच खडकदेवळा खुर्द गावाच्या सरपंच पती सुदाम वसंत वाघ, ग्रामपंचायत सदस्य श्रावण गायकवाड ,माजी ग्रामपंचायत सरपंच रमेश शेलार ,ग्रामपंचायत शिपाई अण्णा दाभाडे ,युवा नेते बापू पाटील आदींनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही आजीबाईंना धीर दिला व आजीबाईंना पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले सदर घटने प्रकरणी वन विभागाकडून घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला आहे सदर घटनेत दोन्ही आजीबाईंना लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी मागणी खडकदेवळा गावकऱ्यांनी केली आहे

बाईट – ग्रामस्त रहीवासी आजीबाई

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button