बुलढाणा – जिल्ह्यातील 1 ते 20 पटसंख्या असेलेल्या 145 शाळा होणार बंद
बुलढाणा - जिल्ह्यातील 1 ते 20 पटसंख्या असेलेल्या 145 शाळा होणार बंद
येत्या शैक्षणिक सत्रापासून 1 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कमी पटसंख्या असलेल्या आर्थिक दृष्टया शाळा चालवणे परवडत नसल्याने या शाळा बंद करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या 128, पालिकेच्या 4 तर खासगी तेरा अशा एकूण 145 शाळांचा समावेश आहे.यामुळे ग्रामीण व खेड्या पाड्यातील, दुर्गम व डोंगराळ भागातील अशा शाळा बंद होणार असल्याने त्या भागातील विद्यार्थ्यांचे भविष्याच काय असा प्रश्न निर्माण होत आहे.यामुळे याला शिक्षक संघटना आणि पालकवर्ग विरोध करतांना दिसत आहे.बुलढाणा जिल्हयात ० पटसंख्या असलेल्या मलकापूर येथील २ शाळा आहेत. तर 1 ते 5 पटसंख्या असलेल्या जिल्ह्यात 17 शाळा आहेत. 6 ते 10 पटसंख्या असलेल्या 25 शाळा असून 11 ते 20 पटसंख्या असलेल्या 101 शाळा जिल्ह्यात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा एकुण 145 शाळांमध्ये 1 ते 20 पटसंख्या आहे.कमी पटसंख्या असल्यामुळे या शाळा सुरु ठेवणे आर्थिकदृष्ट्या राज्य शासनाला परवडणारे नाही..हे या शाळा बंद करण्यामागचे कारण आहे, असे सांगितले जाते आहे.मात्र याला शिक्षक संघटना आणि पालकवर्ग विरोध करतांना दिसत आहे.
बाईट:- उमेश जैन,प्राथमिक उपशिक्षणाधिकारी,बुलढाणा..