पुणेमहाराष्ट्र

पुणे-रिसोड ट्रॅव्हल्स ला बदनापूर येथे भीषण अपघात, 7 जण जखमी

पुणे-रिसोड ट्रॅव्हल्स ला बदनापूर येथे भीषण अपघात, 7 जण जखमी

बदनापूर येथे रिसोड कडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला मोठा अपघात होऊन सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली. पुण्याहून रिसोड कडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स ला बदनापूर येथे अपघात घडला आहे. रस्त्यावर असलेला खड्डा चुकवण्याच्या नादात ट्रॅव्हल्स डिव्हायडेडला आदळली आणि रोडवर पलटी झाली. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले तर 5 ते 7 जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते असे समजते. अपघाताची माहिती मिळतात बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. दरम्यान ट्रॅव्हल्स रोडवर आडवी झाल्याने जालना रोडवर वाहतूक विस्कळीत झाली वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाने क्रेन बोलावून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करून दिला. काही वेळाने वाहतूक सुरळीत झाली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button