महाराष्ट्रमुंबई

कुर्ल्यातील श्री मुक्तेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार

कलिना विधानसभेतील वॉर्ड क्रमांक 166 येथील सोनापूर लेन हिंदू स्मशानभूमीत खासदार पूनम ताई महाजन यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या

मुंबई: कलिना विधानसभेतील वॉर्ड क्रमांक 166 येथील सोनापूर लेन हिंदू स्मशानभूमीत खासदार पूनम ताई महाजन यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या श्री मुक्तेश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धार नुकताच संपन्न झाला.

या कार्यक्रमात आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली तसेच सर्व शिवभक्तांसोबत पूनम ताई महाजन यांनी सहभागी होऊन श्री मुक्तेश्वर महादेवाचे दर्शन आणि आशीर्वाद घेतला. श्री मुक्तेश्वर महादेव मंदिर ख्यातिप्राप्त असून स्मशानभूमीत महादेवाचे मंदिर क्वचितच असते. 2 दिवसीय सुरु असलेल्या कार्यक्रमात उदय प्रताप सिंह, दीपक जैन, भरत जेठवा, मितेश जेठवा, महेंद्र गोहिल, अमन दीक्षित, ज्योती पढीयार, एस अण्णामलाई, ललिता अण्णामलाई, बाबू बत्तेली, रियाझ मुल्ला, अजीज खान, संदीप येजरे आदी उपस्थित होते. अध्यक्ष सतिश लाघवे, गिरीश जेठवा, वैभव कोयदे, गणेश गायकवाड, रोहन शेट्टी, विजय काळसेवालेकर, गणेश सकपाळ यांनी सर्व भक्तांचे स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button