परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक गुन्हे शाखा 8 ने दोन आरोपींना अटक केली
परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना मुंबई गुन्हे शाखा 8 ने अटक केली आहे.
श्रीश उपाध्याय/मुंबई
परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना मुंबई गुन्हे शाखा 8 ने अटक केली आहे.
23 मार्च रोजी विलेपार्ले पोलिसात एफआयआर क्रमांक 298/24 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार, काही लोक भारतातील बेरोजगारांना परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बेकायदेशीरपणे लाओस नावाच्या देशात घेऊन जात असत. त्यांना तिथे नेऊन अवैध काम करायला लावायचे. विरोध करणाऱ्यांना ते कैद करायचे आणि त्यांच्या सुटकेसाठी पैसे उकळायचे. या प्रकरणाचा तपास करत गुन्हे शाखा 8 ने जेरी फिलिप जेकब आणि गॉडफ्री अल्वारेस यांना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सह पोलिस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अतिरिक्त पोलिस आयुक्त शशीकुमार मीना, पोलिस
उपायुक्त विशाल ठाकूर, सहायक पोलिस आयुक्त महेश देसाई यांच्या सूचनेनुसार वरील कारवाई गुन्हे शाखे 8चे प्रभारी पोलिस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या पथकाने केली आहे.