महाराष्ट्रमुंबई

गुन्हेगारांच्या जामिनासाठी बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या ५ आरोपींना अटक

गुन्हेगारांच्या जामिनासाठी बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत गुन्हे शाखा 6 ने 5 आरोपींना अटक केली आहे. कोणत्याही गुन्ह्यात

गुन्हेगारांच्या जामिनासाठी बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत गुन्हे शाखा 6 ने 5 आरोपींना अटक केली आहे.
कोणत्याही गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या जामीनासाठी बनावट आधारकार्ड आणि पगार प्रमाणपत्रे बनविणारी टोळी सक्रिय असल्याची गुप्त माहिती मुंबई गुन्हे शाखा 6 ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मानखुर्द येथे छापा टाकून 5 आरोपी अमित गिजे, बंडू कोरडे, अहमद कासिम शेख, संजीव गुप्ता, उमेश कावळे यांना अटक केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सह पोलिस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अतिरिक्त पोलिस आयुक्त शशीकुमार मीना, पोलिस उपायुक्त (प-१) विशाल ठाकूर यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेचा प्रभारी 6चे प्रभारी पोलिस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांच्या पथकाने वरील कारवाई केली आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button