महाराष्ट्रमुंबई
अडीच कोटींच्या चोरीच्या मालासह मोलकरणीला अटक
घरात काम करताना मौल्यवान वस्तूंसह घरातून लाखोंचे दागिने चोरणाऱ्या मोलकरणीला पवई पोलिसांनी अटक केली आहे.
श्रीश उपाध्याय/मुंबई
घरात काम करताना मौल्यवान वस्तूंसह घरातून लाखोंचे दागिने चोरणाऱ्या मोलकरणीला पवई पोलिसांनी अटक केली आहे.
पवई पोलीस ठाण्यांतर्गत राहणाऱ्या महिलेने आपल्या घरात काम करणाऱ्या महिलेने घरात ठेवलेले दागिने चोरून नेल्याची फिर्याद पोलिसांत दिली. पोलिसांनी तक्रार नोंदवून मोलकरणीची चौकशी केली आणि तिच्याकडून 4209 ग्रॅम सोने आणि 425 ग्रॅम चांदीचे दागिने( किमत 2,69,56,715 रुपये) जप्त केले. या मोलकरणीकडून 60,800 रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सह पोलीस आयुक्त सत्यनारायण, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त (झोन-10) मंगेश शिंदे यांच्या सूचनेनुसार पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. .