महाराष्ट्रमुंबई

Mumbai: मुख्यमंत्र्याची बनावट सही प्रकरणावरून महेश तपासे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) आक्रमक

Mumbai: महेश तपासे म्हणाले की, गुंडांना मुख्यमंत्री शिंदे यांची भीती राहिली नाही कारण यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयात एक तोत्या अधिकारी कार्यरत होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बनावट स्वाक्षरीचे काही दस्तावेज समोर आले. या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाच्या कार्यप्रणालीवर तीव्र आक्षेप घेत सडकून टीका केली आहे.

महेश तपासे म्हणाले की, गुंडांना मुख्यमंत्री शिंदे यांची भीती राहिली नाही कारण यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयात एक तोत्या अधिकारी कार्यरत होता. आता बनावट शिक्के व बनावट सह्यांची नवीन प्रकरणे समोर आली असून जनतेच्या विश्वासाला हरताळ फासण्याचे काम सुरू आहे या शब्दात तपासे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाचा समाचार घेतला.

तोत्या अधिकारी, बनावट शिक्के, बनावट सह्या एवढी मजल मारणे इतकी हिम्मत काही लोकांची होते याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचा धाक अशा लोकांवर राहिला नाही.

बनावट सह्यांचा दुरुपयोग करून कोणा कोणाच्या बदल्या केल्या, कुठले कुठले महत्त्वाचे आदेश काढण्यात आले याची सखोल चौकशीची मागणी आम्ही करत आहोत व बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करून जारी केलेले सर्व आदेश गोठवावेत अशी मागणी महेश तपासे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button