मराठी राजभाषा गौरव दिन निमित्त खा.गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते मराठी भाषा निबंध स्पर्धेचे बक्षीस लहान मुलांना आणि वरिष्ठ नागरिकांचे सन्मान करण्यात आले
मराठी राजभाषा गौरव दिन निमित्त खा.गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते मराठी भाषा निबंध स्पर्धेचे बक्षीस लहान मुलांना आणि वरिष्ठ नागरिकांचे सन्मान करण्यात आले
मुंबई,२७ फेब्रुवारी २०२४:
मराठी एकता प्रतिष्ठान, मुंबईच्या वतीने मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी उत्तर मुंबईचे संसदरत्न खा.गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते १२ लहान मुलांना निबंध स्पर्धेचे विजेते म्हणून पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच वरिष्ट नागरिक म्हणून सत्कारमुर्ती श्री. दत्ताराम पाटेकर यांचे ही शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
दारूवाला कंपाउंड, स्वामी विवेकानंद रोड, मालाड पश्चिम येथे आयोजित मराठी राजभाषा दिवस निमित्त एकूण ४५० नागरिक सहभागी झाले. यावेळी खासदार शेट्टी यांनी मराठी राजभाषा गौरव दिवस चे औचित्य साधुन लोकसभेत त्यांनी मांडलेल्या मराठीभाषा अभिजात दर्जा प्राप्त झाले पाहिजे त्यासंबंधी केलेले प्रयत्न विषय आपल्या भाषणात सांगितले आणि सर्व लोकांना शुभेच्छा दिल्या. मराठी एकता प्रतिष्ठान मुंबई अध्यक्ष श्री. प्रशांत पिरणकर, यांनी खा.गोपाळ शेट्टी यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी एका मोठा बॅनर वर मराठी भाषेत स्वाक्षरी करण्याचे उपक्रम आलेल्या सर्व नागरिकांना सांगितले होते. खा. गोपाळ शेट्टीने ही या बॅनर वर आपल्या स्वाक्षरी करून सर्वांना स्वाक्षरी करावे असे आवाहन केले.
मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात भाजपा मुंबई सचिव विनोद शेलार, मालाड मंडळाचे सरचिटणीस दीपक जोशी संकल्प शर्मा ब्रिजेश सिंह, मराठी एकता प्रतिष्ठान चे चिटणीस चंद्रशेखर पत्याणे, उपाध्यक्ष सुधिर भोगल, खजिनदार नितीन मोरे आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.