Uncategorizedमहाराष्ट्रमुंबई

अमृत भारत योजनेतून ५५४ कोटींचा निधी, मुंबईतील २० रेल्वेस्थानकांचा कायापालट होणार

मुंबईच्या रेल्वे स्टेशनवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात भाजपा मुंबईकरांना सहभागी करून घेणार

दि. २६ फेब्रुवारी, २०२४ रोजी सकाळी १०.४५ वा. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी भारतातील ५५४ हून अधिक रेल्वेस्थानकामधील विविध विकासकामे तसेच १५०० रोड ओव्हर ब्रीज व भुयारी मार्गाचे उद्घाटन करणार आहेत*

• मुंबई लोकलच्या २० स्थानकांचा विकास
• मध्य रेल्वेवरील १२ स्थानकांचा समावेश
• पश्चिम रेल्वेवरील ८ स्थानकांचा विकास

• भारतीय रेल्वेच्या वतीने अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत अपग्रेड आणि आधुनिकीकरणासाठी देशभरातील 1309 स्थानकांचे काम केले जाणार आहे.

• 4886 कोटींपेक्षा जास्त खर्च करून रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाईल. 66
पैकी 11 महाराष्ट्रात  आहेत.

महाराष्ट्रातील 11 स्थानकांपैकी मरीन लाइन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, लोअर परळ, प्रभादेवी जोगेश्‍वरी, मालाड आणि पालघर या 8 उपनगरीय स्थानकांची पायाभरणी करण्याकरिता 233 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

*मध्य रेल्वेच्यादेखील 12 स्थानकांचा होणार कायापालट*

या बारा स्थानकांमध्ये सँडहर्स्ट रोड, भायखळा, चिंचपोकळी, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, मुंब्रा, दिवा, शहाड, टिटवाळा, वडाळा रोड, इगतपुरी या स्थानकांच्या समावेश आहे. यासाठी मध्य रेल्वे मुंबई विभागाला 260 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

या बारा स्थानकांमध्ये सर्वात जास्त निधी हा दिवा रेल्वे स्थानकाच्या पुनर्बांधणी आणि पुनर्विकासासाठी देण्यात आला आहे.

तर तब्बल 45 कोटी रुपये दिवा रेल्वे स्थानकाच्या कामासाठी देण्यात आले आहेत.

*233 कोटी रुपये खर्च करून रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास*

पश्चिम रेल्वेतील आठ स्थानकांपैकी जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या पुनर्बांधणी आणि आधुनिकीकरणासाठी 50 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

मलाड रेल्वे स्थानकाच्या पुनर्व विकासासाठी 35 रुपये कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

लोअर परेल रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 30 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे.

मरीन लाईन रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 28 कोटी रुपये देण्यात आला आहे.

ग्रँड रोड रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 28 कोटी रुपये,

चर्नी रोड रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 23 कोटी रुपये,

प्रभादेवीसाठी 21 कोटी आणि पालघर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास आणि पुनर्बांधणीसाठी 18 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

असे मिळून एकूण 233 कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्रात पश्चिम रेल्वेतील 8 स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील 20 स्थानकांचा पुनर्विकास होणार- यात अधिक माहिती अशी की,

मरीन लाईन्स, चर्नी रोड, ग्रँड रोड, लोअर परळ, प्रभादेवी, जोगेश्वरी आणि मालाड स्थानकांवर बारा मीटर रुंद पायी ओव्हर ब्रिजसाठी तरतूद करण्यात आली आहे

. या कामासाठी 85.23 कोटी इतका खर्च येणार असल्याचा अंदाज आहे. याचा खर्चदेखील 233 कोटी रुपयांमध्ये समाविष्ट आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील 8 आणि मध्य रेल्वे मार्गावरील 12 असे मिळून मुंबईतील एकूण 20 स्थानकांच्या पुनर्विकास होणार आहे.

या कामांमध्ये सुधारित टॉयलेट बॉक्स आणि ड्रेनेज सिस्टीम बसवणे, स्ट्रक्चरल दुरुस्ती आणि छतावरील पत्रांची दुरुस्ती करणे, तिकीट बुकिंग ऑफिस, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आसन व्यवस्था आणि पार्किंग क्षेत्र तयार करणे या कामांची तरतूद आहे.

अमृत भारत योजनेंतर्गत या स्थानकांमध्ये १२ मीटर रुंदीचे पादचारी पूल बांधण्यात येतील.

आधुनिक स्वरुपात नव्या रचनेसह स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. अत्याधुनिक कचरा व्यवस्थापन, आधुनिक बैठक व्यवस्था,

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विजेचे दिवे बसवले जाणार आहेत. रेल्वे स्थानकांमध्ये लिफ्ट आणि सरकत्या जिने देखील बसवले जाणार आहेत.

रेल्वेच्या वेळा दर्शवण्यासाठी आधुनिक डिजीटल बोर्ड, तिकीटघरांचा विकास करण्यात येईल. हा विकास करताना दिव्यांगांचा देखील विचार केला जणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button