भाजयुमो, मुंबईच्या वतीने आयोजित करण्यात आलेले नवं मतदार संमेलन सर्व ३६ विधानसभांमध्ये संपन्न झाले याला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज देशभरात ५००० हून अधिक ठिकाणी नवीन मतदार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याच शृंखलेत भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईच्या वतीने ही मुंबईतील सर्व ३६ विधानसभांमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी १८ ते २५ वयोगटातील नवं मतदार, युवक आणि युवतींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. ५० लाखांहून अधिक नवीन मतदारांनी देशाच्या पंतप्रधानांना एकाच वेळी ऐकल्याचे प्रथमच घडले.
हा स्वतःच एक विक्रम आहे.
उपस्थित युवकांना संबोधित करताना पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी म्हणाले, “हे कालचक्र दोन कारणांसाठी खूप महत्त्वाचे आहे – पहिले, भारताचा अमृत काल सुरू झाला आहे अशा वेळी तुम्ही सर्वजण मतदार झाला आहात. दुसरे म्हणजे, उद्या २६ जानेवारीला देश आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करेल.
पुढील २५ वर्षे तुमच्यासाठी आणि भारतासाठी महत्त्वाची आहेत.इतक्या युवकांशी संवाद साधण्याची माझ्या आयुष्यातील ही पहिलीच संधी आहे आणि जगातील कोणत्याही राजकारण्यासाठी ही कदाचित पहिलीच संधी आहे. सर्व नवीन मतदारांना मी सलाम करतो. आज जेव्हा देश २०४७ पर्यंत विकसित भारत बनण्याच्या ध्येयावर काम करत आहे, तेव्हा भारताची दिशा काय असेल हे तुमचे मत ठरवेल. १९४७ च्या २५ वर्षांपूर्वी देशाला स्वतंत्र करण्याची जशी जबाबदारी भारतातील युवकांवर होती, त्याचप्रमाणे २०४७ पर्यंत म्हणजेच २५ वर्षात विकसित भारत घडवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे.पूर्वी भ्रष्टाचाराच्या आणि घोटाळ्यांच्या बातम्या रोजच मथळ्या बनत असत. कोट्यवधी रुपयांचे घोटाळे सर्रास झाले. त्या अंधकारमय परिस्थितीतून देशाला बाहेर काढण्यात यश आल्याचे आम्हाला समाधान आहे. आज भ्रष्टाचाराचा नाही तर विश्वासार्हतेचा आहे. आज आपण घोटाळ्यांबद्दल नाही तर यशोगाथांबद्दल बोलतो.” इतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरही पंतप्रधानांनी तपशीलवार भाष्य केले.यावेळी भाजयुमो मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना म्हणाले की, या नवमतदार संमेलनाबाबत युवकांमध्ये प्रचंड उत्साह असून, युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत होते. आज स्पष्ट दृष्टी असलेल्या पंतप्रधानांचे प्रभावी भाषण ऐकून त्यांच्यातही नवचैतन्य भरून आले आहे. त्यांना पुढील कामासाठी मार्गदर्शन मिळाले आहे.कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा जी दक्षिण मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर जी, केसी कॉलेजमध्ये, उत्तर मुंबईचे खासदार श्री गोपाल शेट्टी जी मालाड विधानसभेत आणि स्थानिक खासदार, आमदार आणि इतर विविध विधानसभांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.