करमणूकक्राईमबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईलव्हिडीओ
Trending

पोलिसांनी अपहृत चार्टर्ड अकाउंटंटची केली सुखरूप सुटका

श्रीश उपाध्याय

मुंबई

मुंबईतील पवई परिसरातून अपहरण झालेल्या चार्टर्ड अकाउंटंटची पोलिसांनी पाच दिवसांतच अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली आहे.

पवई येथे राहणारा भूषण अरोरा 17 जानेवारी रोजी घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाला होता. त्याची पत्नी मेघा अरोरा हिने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 18 फेब्रुवारी रोजी अपहरणकर्त्यांनी मेघाकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तात्काळ एफआयआर क्रमांक ९१/२४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तंत्रज्ञान आणि माहितीच्या मदतीने नवी मुंबई परिसरातून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून भूषण अरोरा याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अमोल म्हात्रे, निरंजन सिंग, विधि चंद्र यादव आणि मोहम्मद सुलेमान उर्फ ​​सलमान शेख या एकूण चार आरोपींना अटक केली आहे. तपासाअंती असे आढळून आले की, आरोपींनी भूषण अरोराच्या कंपनीत गुंतवणूक केली होती आणि शेअर बाजारातील नुकसानीमुळे भूषण यांना त्यांचे पैसे परत करता आले नाहीत. ही रक्कम वसूल करण्यासाठी आरोपींनी भूषण अरोरा यांचे अपहरण केले होते.

मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलिस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलिस उपायुक्त (झोन-10) दत्ता नलावडे, सहायक पोलिस आयुक्त विनायक मेर,यांच्या सूचनेनुसार पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे, पोलीस निरीक्षक गणेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कांबळे, विनोद लाड व पथकानेवरील कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button