बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

नालासोपारा आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयात भगवान श्री धन्वंतरी महायज्ञाचे आयोजन

मुंबई

10 नोव्हेंबर 2023 रोजी धन्वंतरी जयंती निमित्त महाविद्यालयात “आठवा आयुर्वेद दिवस” ​​साजरा करण्यात येत आहे. या दिना निमित्त महाविद्यालय व इतर गावांमध्ये आयुर्वेद जनजागृती व्याख्यान, मोफत आरोग्य शिबिर, रांगोळी, निबंध, वक्तृत्व, धन्वंतरी स्तवन पठण,बिना अग्नी पाककृती स्पर्धा असे कार्यक्रम सुरू आहेत. यानिमित्ताने जनस्वास्थ्य व सामाजिक स्वास्थ्याच्या माध्यमातून विश्व कल्याणाच्या भावनेने प्रेरित होऊन जन आरोग्य व जनभागीदारी द्वारा आरोग्याची देवता “भगवान श्री धन्वंतरी महायज्ञ” शुक्रवार, दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10:00 ते दुपारी 2:00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.सर्वसामान्य जनतेच्या आणि समाजाच्या उत्तम आरोग्यासाठी आयोजित या महायज्ञामध्ये आपणा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण देत आहोत.

स्थळ: नालासोपारा आयुर्वेद मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज रोड आचोळे, नालासोपारा पूर्व (महाविद्यालय प्रांगण).
आपण सर्वांनी या यज्ञात कुटुंबासह सहभागी होऊन समिधा साकल्य अर्पण करून सुंठ, धणे,गूळ व सुखा मेवा इत्यादी औषधीयुक्त प्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button