बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल

संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्स विशेष

1 कोटी कर्क रुग्णांना अन्नदान, लाखोंच्या सेवेसह सुश्रूशा

गाडगे महाराज धर्मशाळेकडून सेवेचा महायज्ञ अविरत

‘कॅन्सरमुक्त भारत’ अभियानासाठी प्रयत्न

मुंबई – श्री संत गाडगे महाराजांनी दशसुत्रीच्या माध्यमातून मानवी जवनाच्या सर्वांगिण उत्थानाचा मार्ग दाखविला. त्यांच्या याच विचारांवर मार्गक्रमन करत संत गाडगे महाराज धर्मशाळेद्वारे सेवाव्रती नागरिकांच्या माध्यमातून 1 कोटी 20 लाख कर्करुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान यासह 21 लाख कर्करुग्णांची सेवाकरून त्यांना आधार देण्यात आला आहे. भविष्यात वाढणाऱ्या कर्करुग्णासंदर्भात चिंता व्यक्त करत समाजसेवक प्रशांत देशमुख यांनी कॅन्सरमुक्त भारत अभियानासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

श्री संत गाडगे महाराजांनी दशसूत्री समाजालाला अर्पण करून मानवी कल्याणाच्या दिशा स्पष्ट केल्या. त्यांच्या याच विचारावर चालत प्रशांत देशमुख यांनी गाडगे महाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार जगभरात व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. दादरच्या (मुंबई) धर्म शाळेच्या माध्यमातून ते कर्क रुग्णांच्या निवासासह त्यांना अन्नदान व वैद्यकीय मदत करतात. मुंबईच्या टाटा ट्रस्टच्या कॅन्सर रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यांचे या ठिकाणीच वास्तव्य असते. ही बाब लक्षात घेता प्रत्येक राज्यात कर्क रुग्णालय, रुग्णांसाठी धर्मशाळा व्हावी यासाठी प्रशांत देशमुख हे केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. गाडगे महाराजांनी दाखवलेला व्यसनमुक्तीचा मार्ग यासाठीही ते देशभरात जाऊन जनजागृती करत असतात. दादरच्या धर्मशाळेच्या माध्यमातून 1996 पासून ते गाडगे महाराजांचा विचार पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. येथे आतापर्यंत आलेल्या 1 कोटी 20 लाख नागरिकांना अन्नदान करण्यात आले आहे. त्यांचे सेवा, सुश्रूसा, वैद्यकीय सहाय्यतेकरिता मदत करण्यात आली. यासह 21 लाख कर्क रुग्णांना आधार देण्यात आला आहे.

टीबीमुक्तीच्या धर्तीवर कँन्सरमुक्तीसाठीही प्रयत्न

बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामध्ये कॅन्सर या आजाराचा प्रामुख्याने समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2025 पर्यंत टीबी मुक्त भारताची घोषणा केली. त्यात आपण यशस्वीपणे पुढे जात आहोत. तर 2047 पर्यंत विकसित भारताची घोषणा सुद्धा प्रधानमंत्र्यांनी केली आहे. अमृत काळाकडे वाटचाल करत असताना कॅन्सर मुक्त भारत व्हावा यासाठी ही मोहीम सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून व्यापकपणे राबवली जावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहोत, अशी माहिती दादरच्या धर्मशाळेचे व्यवस्थापक प्रशांत देशमुख यांनी बोलताना दिला. सामाजिक उत्तरदायित्व, सामाजिक जाणीवा जपणारे अनेक नागरिक आपल्याला सर्व स्तरावर मदत करत असल्याने गाडगेबाबांचे विचार पोहोचविण्यात मदत होत आहे. त्यामुळे अशा सर्व नागरिकांच्या आम्ही ऋणात राहू इच्छितो अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली.

संत गाडगेबाबा धर्मशाळेच्या माध्यमातून कर्करुग्णांना अन्नदान, वैद्यकीय मदत, निवासाची सुविधा, समुपदेशन, चांगल्या जिवनशैलीसाठी प्रयत्न इत्यादी उपक्रम राबविले जातात. कर्करुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे कँन्सरमुक्त भारत हे अभियान राबविण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button