Mhb पोलिसांनी हिस्ट्री शीटर कारागृहात पाठवले
श्रीश उपाध्याय
मुंबई
तीन गुन्ह्यांतील फरार आरोपीला एमएचबी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बोंबे, पोलीस उपनिरीक्षक संदीप गोरडे, व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार हे बुधवारी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना गुप्त बातमीदाराकडून खबर मिळाली कि, एक संशयित इसम हा गणपतपाटीलनगर, बोरीवली प. मुंबई येथे हत्यारासह फिरत आहे. सदर बातमीच्या अनुषंगाने रात्रपाळी पर्यवेक्षक अधिकारी सपोनि शीतल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथक नमुद ठिकाणी गेले असता तेथे एक इसम पोलीसांना बघून झोपडपट्टीच्या छतावर चढून पळू लागल्याने त्याचा पाठलाग करत पोलीस पथकही घरांच्या छपरावर चढले व आरोपीतास ताब्यात घेतले. त्यावेळी नमुद इसमाकडे एक लोखंडी कोयता मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाणे येथे आणले व त्याचा गुन्हे अभिलेख तपासला असता नमुदचा आरोपीत हा अभिलेखावरील आरोपीत असल्याचे समजले. व त्याचेवर एम.एच.बी. कॉलनी गुरक्र. 629/2023 क. 4,25 भा.ह.का. सह क. 37(1),135 म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
अटक आरोपी शादाब मेक्राणी याच्यावर दहिसर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. याशिवाय दहिसर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्यात शादाब फरार
आणि त्याच वर्षी एमएचबी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल होते.
एमएचबी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बोंबले, संदीप गोर्डे व पथकाने वरील कारवाई केली.