दिंडोशी मतदार संघात रस्ते रुंदीकरणआणि नवीन रस्ते विकासासाठी बैठक
मुंबई, 31ऑक्टोबर 2023 –
मालाड (पूर्व) दिंडोशी मतदार संघातील प्रभाग क्रं. 37, 38, 39, 42, 43 मधील रस्ते रुंदीकरण आणि प्रस्तावीत नवीन रस्ते विकासासाठी पी उत्तर विभाग, लिबर्टी गार्डन, मालाड (पश्चीम) येथे संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत प्रभागाचे मा. नगरसेवक आणि कार्यकारी अभियंता, सह अभियंता यांच्यासोबत रस्ते खुले करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
दिंडोशी मतदार संघात अतिक्रमण आणि लोकवस्ती अफाट वाढल्यामुळे स्थानिकांना रस्त्यावर सुरळीत प्रवास करणे कठिण झाले होते. तसेच वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. यावर उपाययोजना म्हणून रस्ते रुंदीकरण आणि प्रस्तावित नवीन रस्ते विकसीत करणे अत्यंत गरजेचे आहे. या संदर्भात मा. नगरसेवक श्री विनोद मिश्रा यांनी राज्य सरकार तसेच महापालिकेला वारंवार पत्र लिहून तसेच प्रत्यक्ष भेट घेवून प्रभागातील समस्या मांडली होती.
या बैठकीत कार्यकारी अभियंता यांनी प्रभागातील रस्ते रुंदीकरण आणि प्रस्तावित नवीन रस्ते विकासासंदर्भात चर्चा केली. या बैठकीला मा. नगरसेवक श्री विनोद मिश्रा यांच्या सह मा. नगरसेविका श्रीमती प्रतिभा शिंदे,मा. नगरसेवक आत्माराम चाचे, शिवसेना नेते श्री विष्णु सावंत, श्री वैभव भरडकर देखील उपस्थित होते.