बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाचे मी मनापासून आभार मानते सत्यमेव जयते

ट्रिपल इंजिन खोके सरकारला मायबाप जनतेसाठी वेळच नाही

कायदा आणि सुव्यवस्थाचा प्रश्न ऐरणीवर नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

जनतेची फसवणूक करण्याच पाप हे भारतीय जनता पक्षाने केलं

आमदार अपात्रतेवरुन खासदार सुप्रियाताई सुळेंचा खोके सरकारवर हल्लाबोल

दिल्ली, 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार अपात्र प्रकरणात 31 जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज विधानसभा अध्यक्षांना दिले आहे. मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनापासून आभार मानते. महाराष्ट्राचे ट्रीपल इंजिन सरकार सुट्ट्यांचे कारण देऊन आमदार अपात्र प्रकरणात पळपुटेपणा करत होती. राज्यात पॅालिसी पॅरालिसीस आहे. त्यांना मोठी चपराक आहे. आम्हाला न्याय नक्की मिळेल. सत्यमेव जयते असे प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी नवी दिल्ली येथे प्रसार माध्यमांची बोलताना दिली.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, आज ज्या पद्धतीने काही ना काहीतरी कारण काढून महाराष्ट्राचे ट्रिपल इंजिन खोके सरकार हे पळकुटेपणा करत होत. सुट्ट्यांचे कारण सांगून हे प्रकरण लांबवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. राज्य महाराष्ट्रमध्ये पॉलिसी पारालिसिस आहे. या सरकारमध्ये काम कोणीच करताना दिसत नाही आहे. तुम्ही बघता महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने कोर्टाने आम्हाला न्याय दिलेला आहे. मी माननीय कोर्टाचे मनःपूर्वक आभार मानते.

सुप्रियाताई सुळे पुढे म्हणाल्या की, आज माझी मुलगी देखील माझ्यासोबत होती योगायोगाने माझ्या मुलीचा वाढदिवस आहे. कारण तिला तिचा वाढदिवस तिच्या आईबरोबर साजरा करायचा होता. पण मी तिला म्हणाले होते की मी कोर्टात जाणार आहे, त्याच्यामुळे माझी मुलगी आज सुप्रीम कोर्टात माझ्यासोबत आली होती आणि एका अर्थी मला अभिमान वाटतो की मुलगी नको ना असं वाटणाऱ्या समाजामध्ये आज मुली पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. मुलींमध्येही मुलांन इतकी ताकद असते हे आज तुम्ही सगळे बघतात असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

पुढे मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, या राज्याचे गृहमंत्री करताय तरी काय? राज्याच्या गृहमंत्र्यांची नैतिक जबाबदारी आहे. मला असं वाटतं राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही सर्व रेकॉर्ड काढून बघा गेले एक महिन्याभर सातत्याने मी गृहमंत्रालयासोबत पत्र व्यवहारकरून सांगत आहे. आज एका आमदाराच्या घरावर असा हल्ला होणार असेल तर महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. ही गृह मंत्रालयाची आणि यात ट्रिपल इंजिन खोके सरकारची नैतिक जबाबदार असल्याचं सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

 

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ४० दिवस सांगितलं होतं. मराठ्यांनी वेळ दे देऊन देखील काही निर्णय झाला नाही. त्यामुळे आज जी काय परिस्थिती आहे. त्याला जबाबदार हे ट्रिपल इंजिनचा खोके सरकार आहे. त्यांना खोके घ्यायला वेळ आहे पण त्यांना मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाज यांच्यासाठी वेळ नाही. जनतेची फसवणूक करण्याच पाप हे भारतीय जनता पक्षाने केलेल आहे असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. आज जे महाराष्ट्रात अस्थिर वातावरण आहे, हे फक्त हे ट्रिपल इंजिन खोके सरकारचं पाप आहे. लोकांना फसवायचं लोकांना दुखवायचं सत्तेचा गैरवापर करायचा या सरकारकडे सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी वेळच नाही आहे असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button