बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

भाजपाच्या दांडियामध्ये मुंबईकरांच्या तुफान प्रतिसादाचे “नवरंग”

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांची मुंबईतील १०० नवरात्र उत्सव मंडळाना भेट

मुंबई, दि.२०

मुंबईत भाजपातर्फे सुमारे ३०० ठिकाणी नवरात्र उत्सव, दाडिंया, गरबा, देवीचे जागरण, गोंधळ असे कार्यक्रम सुरू असून मुंबईकरांच्या तुफान प्रतिसादात दांडियामध्ये नवरंग भरले आहेत. तर मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघातील तब्बल १०० मंडळाना मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी भेटी देऊन देवीचे दर्शन घेतले व कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले.

दहिहंडी उत्सव, गणेशोत्सव आणि नवरात्री उत्सवात मुंबईकरांसोबत भाजपानेही पुढाकार घेतला असून यावेळी तब्बल ३०० ठिकाणी भाजपा पुरस्कृत आणि थेट भाजपाचा सहभाग असलेले उत्सव साजरे करण्यात येत आहेत. तसेच १८ ठिकाणी भव्य स्वरूपात दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. तर काळाचौकी येथे मराठी दांडियाचे आयोजनही करण्यात आले असून प्रत्येक ठिकाणी मुंबईकरांची तुफान गर्दी आणि उत्साह पहायला मिळतो आहे. फाल्गुनी पाठक, गिताबेन रबारी, अवधुत गुप्ते या गायक कलावंतासंह तरुणाईच्या जल्लोषांमध्ये मैदाने तुडूंब भरुन गेली आहेत. सगळयात आकर्षण ठरले आहे ते वांद्रे पश्चिम विधानभा मतदार संघात सांताक्रुझ येथे आमदार ॲड आशिष शेलार यांनी आयोजित केलेल्या दांडिचे. या दांडियामध्ये प्रसिध्द बॅन्ड हनिफ असलफ यासह बुधवारी गायक सोनू निगम तर गुरूवारी ‍सिनेस्टार अभिनेता सुनिल शेट्टी यांनी हजेरी लावल्यामुळे तरुणाईचा उत्साहाला उधाणच आल्याचे पहायला ‍मिळाले.
दरम्यान, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी मुंबईच्या सहाही लोकसभा मतदार संघाचा देवी दर्शन दौरा करुन सर्व दांडियांसह देवीचे दर्शन घेतले व मंडळाच्या कार्यकर्त्यांना व भाजपा पदाधिका-यांना शुभेच्छा दिल्या.

या दौ-यात त्यांनी सुमारे १०० मंडळाना भेटी दिल्या, आजचा त्यांचा शेवटचा दिवस असल्याची माहिती या दौ-याचे प्रमुख असलेल्या कमलाकर दळवी यांनी दिली. या दौ-यात त्यांच्या सोबत त्या त्या विभागातील स्थानिक जिल्हा अध्यक्ष, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी तसेच मुंबई भाजपा महामंत्री संजय उपाध्याय ही सहभागी झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button