बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मोदी सरकारने नियम बदल करावा – नसीम खान

मुंबई

आज सकल मराठा समाज चांदिवलीच्या वतीने साकीनाका येथील ९० फुट रोड पेनिन्सुला हॉटेल समोर मराठा समाजाच्या आरक्षणाकरिता मोठे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मा. मंत्री व प्रदेश कॉँग्रेस कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान हे स्वत: तिथे पोहचले.

त्यावेळी पत्रकारांशी बोलताना नसीम खान म्हणाले की, सन २०१४ मध्ये कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस सरकार असताना मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा एतिहासिक निर्णय घेतला होता. त्यानंतर नोव्हेंबर २०१४ रोजी सत्तेत आलेल्या भाजपा सरकारकडे सदर आरक्षण चालू ठेवण्याबाबत वारंवार मागणी केल्यानंतर विधानभसभेत आरक्षणावर कायदा करण्याच्या प्रस्तावाला सर्व पक्षाने एकमताने समर्थन दिले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयात भाजपा सरकारने आरक्षणाबाबत भक्कमपणे बाजू न मांडल्याने सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकू शकले नाही, त्यानंतर भाजपा सरकारने पुनर्विचार याचिका सुद्धा सादर केली नाही. नसीम खान पुढे म्हणाले की, भाजपा सरकारला मराठा-मुस्लिम समाजासहीत इतर कोणत्याही समाजाला आरक्षण देण्याची इच्छा नाही फक्त खोटे आश्वासन देण्याचे काम भाजपा सरकार करत आहे. या आंदोलनात नसीम खान यांनी मागणी केली आहे की, केंद्रातील मोदी सरकारने आरक्षणाची ५० टक्केची अट शिथिल करून मराठा-मुस्लिम समाजासहीत इतर समाजाचे प्रलंबित आरक्षण त्वरित बहाल करावे.

या आंदोलनात मुंबई मराठा क्रांति मोर्चाचे समन्वयक प्रशांत परब, गणेश चव्हाण, व्यासदेव पवार, सुहास राणे, जगन्नाथ उदूगुडे, नाना भितांडे, शरद पवार, अमोल मातोले, कृष्णा नलावडे, बाबू गटे, प्रकाश सावंत, प्रभाकर जावकर, भाऊ शेट्टी, अवधूत शेलार, नितीन पवार, दिनेश मधूकुंटा, वजीर मुल्ला, सुभाष गायकवाड, मनोज तिवारी, सुधाकर घोरबाड, विनोद पांडे, घनश्याम गायकवाड आदि लोकांसाहित हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button