बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

कुर्ल्याच्या शिबिरात धर्मादाय संस्थांच्या कामकाज पध्दतीबाबत युक्त्या शिकवल्या

कुर्ला पश्चिम येथील मनराज हाईट्स येथे माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल गलगली व मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज नाथानी यांच्या प्रमुख उपस्थितीत रूग्ण मित्र व सहयोगी संस्थेतर्फे महाराष्ट्र राज्यातील नामवंत अश्या एड डाॅ.रोहिणी पवार यांचे दृकश्राव्याव्दारे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. धर्मादाय संस्थांच्या कामकाज पध्दतीबाबत युक्त्या शिकवल्या आणि नियमांची माहिती दिली.

माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल गलगली यांनी शिबिराची आवश्यकता आणि त्याच्या फायद्याची माहिती सर्वप्रथम सांगितली. तीन तासाच्या सत्रात स्वयंसेवी संस्था स्थापना-नोंदणी, निधीची उभारणी, संस्थांची कामकाज पध्दती, वार्षिक ताळेबंद, प्रशासकीय व्यवस्थापन, सीएसआर ,१२ ए, ८० जी,एफसीआरए नोंदणी व फायदे, नीती आयोग, ई अनुदान इ.महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत समजावून सांगितले. प्रश्नोत्तराच्या तासात विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी आपल्या शंका, अडचणी, प्रश्नांची उत्तरे मार्गदर्शक डाॅ एड रोहिणी पवार यांनी दिली. कार्यशाळेत रूग्ण मित्रशी संलग्न विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते. यावेळी गोविंद मोरे,सलीम शेख, विशाल वाघमारे, एड प्रणिल गाढवे, गणेश पवार, रमेश चव्हाण, राम वर्मा, राजेंद्र कदम, एड विल्सन गायकवाड, प्रदिप मून, अवधूत पारकर,वअरविंद पारकर, प्रकाश वाघ, बाबू बत्तेली, सुभाष गायकवाड, अजीज खान, रत्नाकर शेट्टी, रियाझ मुल्ला, मंजुषा सिंह, श्रुती गमरे, प्रशांत चव्हाण, श्रुती साडविलकर, अमृता पुरंदरे, श्रध्दा बनसोडे,अरुणा सावंत, वीणा खाडीलकर, प्रदिप कुलकर्णी, रहेना शेख, प्रज्वला इंगळे, चारूदत्त पावसकर, गौतम पाईकराव, छाया भटनागर,प्रशांत सावंत, प्रकाश राणे, पुष्पा बनसोडे,अनिल गुरव,पंकज नाईक,किरण गिरकर,विलास कोथमिरे,राकेश तोडणकर,विनायक शिंदे, अमेय गिरकर, राहुल हनवटे, नरेश कुरापती इ.मान्यवर व सहकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button