बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईलव्हिडीओ
Trending

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या एकादशी दिंडीला ठाणेकर विद्यार्थी व पालकांचा उदंड प्रतिसाद

विजय कुमार यादव

ठाणे, दि. 29 ः जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने ठाण्यातील 7 अभ्यासिकांच्या विद्यार्थ्यांसाठी ठाणे शहरातील विविध ठिकाणी एकादशी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या दिंडी सोहळ्यात अभ्यासिकांतील पहिली ते आठवीत शिकणारे सुमारे 560 विद्यार्थ्यांनी पारंपारिक पोशाख परिधान करून रिमझीम पावसात भिजत टाळ, लेझीमच्या तालावर नृत्य करत भगवी पताका व तुळशी वृंदावन डोक्यावर घेत काही अंतर चालत दिंडी काढली. हा मनोहर सोहळा पाहण्यासाठी पालक व ठाणेकर नागरीकांनीही सहभाग घेत जिजाऊच्या उपक्रमाचे कौतूक केले.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने  ठाण्यात विविध ठिकाणी अत्यंत गरीब व गरजू शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका घेण्यात येतात. या अभ्यासिकांमध्ये उच्चशिक्षित डी.एड., बी.एड. दर्जाचे शिक्षक विद्यार्थ्यांची शिकवणी घेतात. विद्यार्थी आणि पालक यांचाही यामध्ये सहभाग वाढत असून आवश्यक असेल तिथे अजून अभ्यासिका सुरू करण्याचा  जिजाऊचा मनोदय आहे. तसेच मोफत संगणक प्रशिक्षण, मेहंदी, ब्युटी पार्लर, शिलाई प्रशिक्षण, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण असे विविध उपक्रमही राबविले जात असून त्यांना ठाण्यातील महिला, मुली, तरुण-तरुणी यांचा मोठा सहभाग आहे.

दरम्यान, आज आषाढी एकादशीनिमित्त  येऊर, परेरानगर, भीमनगर, महात्मा फुले नगर,  दिवा, भोला नगर, इंदिरानगर आदी अभ्यासिकांतील 560 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत पारंपारिक पोशाख परिधान करून रिमझीम पावसात भिजत टाळ, लेझीमच्या तालावर नृत्य करत भगवी पताका व तुळशी वृंदावन डोक्यावर घेत काही अंतर चालत दिंडी काढली. या कार्यक्रमासाठी जिजाऊचे कार्यकर्ते, शिक्षक वृंद यांनी विशेष परिश्रम घेत खुप छान नियोजन केले होते. विविध पारंपारिक वेशातील बाल वारकरी ‘राम कृष्ण हरी, विठ्ठल नामाचा गजर करत ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत होते. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी या मुलांचे कौतूक करताना, ठाणे, पालघर, रायगड ते सिंधुदूर्ग पर्यंत जिजाऊ कार्यरत असून या कोकण पट्टयात गरीब-गरजू विद्यार्थ्यांना 25 लाख वह्या वाटपाचा आणि पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना मदत देण्याचा संकल्प केला आहे. जास्तीत जास्त लोकांनी गाव, तालुका, शहर पातळीवर आम्हाला संपर्क साधावा, गरीब, वंचित, दीन-दलित असा कुणीही शिक्षणापासून मागे राहायला नको. त्याला योग्य शिक्षण व सेवा  देण्यासाठी जिजाऊ तत्पर आहे. ठाणे शहर आणि झडपोली, पालघर येथील कार्यालये सतत उघडी आहेत. जास्तीत जास्त लोकांनी आम्हाला संपर्क साधावा, जिजाऊ आपल्याला नक्कीच मदत करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button