बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल

आषाढी एकदशीनिमित्त बा पांडुरंगाला, वारकरी माऊलींना विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून वंदन

आषाढी एकादशीनिमित्त अजित पवार यांच्याकडून वारकरी माऊलींना, समस्त पांडुरंग भक्तांना शुभेच्छा

महाराष्ट्र समृद्ध करणारी पांडुरंगभक्तीची पताका अशीच डौलानं उंच फडकत राहूदे ;विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

राज्यात पाऊसपाणी चांगलं होऊदे, शिवारात पिकांची,सर्वांच्या घरात धनधान्याची, दुधदुभत्याची समृद्धी येऊदे…

महाराष्ट्र महागाई, बेरोजगारी, जातीय-धार्मिक दंगलींपासून मुक्त कर,अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ठ रुढी-परंपरांपासून महाराष्ट्राला दूर ठेव; विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं पांडुरंग चरणी साकडं

सर्व जाती, धर्म, पंथांच्या नागरिकांमधली एकजूट कायम ठेवून महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्याची ताकद सर्वांना दे…

 

मुंबई,

दि. २८ जून –

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या बा पांडुरंगाला आणि पांडुरंगभेटीच्या ओढीने शेकडो किलोमीटर पायी चालून पंढरपूरला पोहोचलेल्या वारकरी माऊलींना वंदन केले आहे. बा पांडुरंगाची भक्ती आणि पंढरपूरची पायी वारी ही महाराष्ट्राची शेकडो वर्षांची गौरवशाली अध्यात्मिक, संतपरंपरा, भक्तीपरंपरा आहे. सर्व जाती, धर्म, पंथांच्या भक्त माऊलींना एकत्र आणणारी, स्त्री-पुरुष समानतेचे दर्शन घडवणारी, महाराष्ट्राच्या मातीला अध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिकदृष्ट्या समृद्ध करणारी पांडुरंगभक्तीची, आषाढीवारीची ही पताका अशीच डौलाने उंच फडकत राहूदे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील जनतेला, वारकरी माऊलींना, समस्त पांडुरंग भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बा पांडुरंगाकडे, “राज्यात पाऊसपाणी चांगलं होऊदे. शेतकऱ्यांच्या शिवारात पिकांची, घरात धनधान्याची, दुधदुभत्याची समृद्धी येऊदे. सर्वांना उत्तम आरोग्य लाभूदे. महाराष्ट्र महागाई, बेरोजगारी, जातीय-धार्मिक दंगलींपासून मुक्त होऊदे. अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरांपासून महाराष्ट्राला दूर ठेव. सर्व जाती, धर्म, पंथांच्या नागरिकांमधली एकजूट कायम ठेवून महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्याची ताकद आम्हा सर्वांना दे,” असे साकडंही घातले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button