बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

कुर्ला येथील काजूपाडा पाईपलाईन रस्ता खुला करण्यासाठी नसीम खान रस्त्यावर उतरले

मुंबई

प्रतिनिधी :-

कुर्ला(प) मनपा एल विभागाच्या हद्दीतील काजूपाडा पाईपलाईनचा रस्ता रुंदीकरण व सिमिट्रीकरण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून पालिका आयुक्त स्तरावर प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री मो. आरिफ (नसीम) खान यांनी वारंवार बैठका घेऊन काजूपाडा पाईपलाईन रस्ता रुंदीकरण व सिमिट्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु काही राजकीय मंडळी त्यांची राजकीय पोळी शेकण्यासाठी काही व्यापाऱ्यांना हुसकावून हायकोर्टात काजुपाडा पाईपलाईन रस्ता रुंदीकरण व सिमिट्रीकरण थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु मो. आरिफ (नसीम) खान यांनी सतत पाठपुरावा करत आपले सहयोगी श्री गणेश चव्हाण श्री संजय तिवारी यांच्यामार्फत हायकोर्टात सातत्याने पाठपुरावा करून काजूपाडा रस्तारुंदीकरण व सिमिट्रीकरण करण्याचा निर्णय करून घेतला.

गेल्या दोन वर्षापासून काजूपाडा रस्तारुंदीकरण व सिमिट्रीकरण करण्याचे काम मनपाद्वारे सुरू होते. मागील एका महिन्यापूर्वी काजूपाडा रस्तारुंदीकरण व सिमिट्रीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतरही तो रस्ता सेंट ज्यूड्स हायस्कूल व बेदी हॉल या दोन्हीही ठिकाणी अनधिकृत बॅरिकेट व खाजगी बाउन्सर उभे करून नियमबाह्य पद्धतीने रस्ता बंद करून ठेवला होता, ज्यामुळे हजारो विद्यार्थी व विद्यार्थिनींना तसेच 25 हजार पेक्षा जास्त विभागातील रहिवाशांना दवाखान्यात, शाळेत, नोकरी-धंद्यावर जाण्यासाठी खूप त्रास होत होता. गेल्या काही दिवसापासून रोज येण्या-जाण्याकरिता स्थानिक रहिवाशी व तेथे उभे असलेले बाउन्सर मध्ये भांडणे होत होती.
रस्ता बंद असल्यामुळे होणारा त्रास व बाउन्सर सोबत होणारे रोजचे भांडण अशा तक्रारी नसीम खान यांच्याकडे आल्यानंतर आज त्यांनी मनपा एल विभागाचे सहाय्यक पालिका आयुक्त, साकीनाका पो. ठाणे पोलीस निरीक्षक व साकीनाका विभागाचे वाहतूक अधिकारी यांच्यासोबत काजुपाडा पाईपलाईन रस्त्यांचा दौरा व चर्चा करून अधिकाऱ्यामार्फतच काजुपाडा पाईपलाईन रस्ता लोकांसाठी खुला करण्यात आला.

रस्ता खुला झाल्यामुळे स्थानिक रहिवाशी, दुकानदार, पालक तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींनी नसीम खान यांचे धन्यवाद मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button