निलेश राणे विरोधात “जेल भरो” आंदोलन करणार्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक…
मुंबई
शुक्रवार दि. ९ जून –
निलेश राणे याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांच्याविरोधात बदनामीकारक ट्विट केल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जेल भरो आंदोलन केले. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आझाद मैदानातून पोलीस व्हॅनमध्ये बसवून यलो गेट पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.
निलेश राणे याच्याकडे कोणतीही नैतिकता नसल्याने ईडी सरकार त्याच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही, याची आम्हाला खात्री होती, त्यामुळेच निषेध म्हणून आम्ही जेल भरो आंदोलन करवून अटक केली.
यावेळी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, राखी जाधव व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते एडवोकेट अमोल मातेले यांच्यासह सर्व जिल्हाध्यक्ष, युवक व महिला यांच्यातर्फे मुंबई ‘जेल भरो’ आंदोलन करण्यात आले.
युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख,महिला अध्यक्षा सुरेखाताई पेडणेकर, ओबीसी कार्याध्यक्ष राज राजापूरकर, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे , प्रशांत पाटील, आरती साळवी, भावना घाणेकर, प्रमोद पाटील यांच्यासह अनेकांना पोलिसांनी अटक केली.