मुंबई गुन्हे शाखेने दीड किलो चरससह 5 जणांना केली अटक
श्रीश उपाध्याय
मुंबई
मुंबई क्राईम ब्रँच 6 ने एका गुप्त माहितीच्या आधारे पाच आरोपींना वाकोला येथून अटक केली आहे.
सांताक्रूझ येथील वाकोला परिसरात आशिष नावाचा व्यक्ती चरस विकत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा 6 चे पोलीस उपनिरीक्षक संदीप रहाणे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आशिष राठोड, इंद्रिश मुजावर, निरव निषाद, अशरफ कुरेशी आणि सिराज शेख या पाच आरोपींना 1 किलो 625 ग्राम चरससह अटक केली.
जप्त चरसची किंमत
48,75,000 रुपये सांगितले जात आहे. आरोपींकडून 353 ग्रॅम गाज़ाही जप्त करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिस सह आयुक्त(गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चौहान, पोलीस उपायुक्त (प्र.-१) कृष्णकांत उपाध्याय यांच्या सूचनेनुसार वरील कारवाई गुन्हे शाखा 6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांच्या पथकाने केली आहे.