बातम्याभारतमुंबईलाईफस्टाईल
Trending

पंतप्रधान मोदीजींच्या स्वप्नातील नवीन भारत घडवूया

पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे प्रतिपादन

आ. भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवली पूर्वमध्ये रोजगार मेळाव्याचा शुभारंभ

मुंबई : राज्यातील प्रत्येक बेरोजगाराला नोकरी देणे, स्वयंरोजगारासाठी सहाय्य करणे हे आमचे कर्तव्य आहे. या माध्यमातूनच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील नवीन भारत निर्माण करू, असे प्रतिपादन पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. कांदिवली पूर्व येथे प्रमोद महाजन मैदानात आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार अतुल भातखळकर यांसह कौशल्य विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री लोढा म्हणाले, विविध कंपन्यांना आवश्यक मनुष्यबळ हवे असते आणि शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीची आवश्यकता असते यामधील दुवा आमदार अतुल भातखळकर यांच्या रूपाने या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तयार झाला आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात अशा पद्धतीचे मेळावे महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

आमदार भातखळकर म्हणाले, या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आपण प्रत्येक वॉर्डात त्यांच्या कॅम्प आयोजन केले, ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रजिस्ट्रेशन झाले आहे. अनेकदा शिक्षण पूर्ण झाल्यावर कोणत्या कंपनीशी संपर्क साधावा हे माहीत नसते त्यामुळे या मेळाव्याच्या माध्यमातून बेरोजगार तरुण-तरुणींसाठी ही एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. नोकरी बरोबरच स्वयंरोजगारासाठी मुद्रा सारख्या योजनेतून अर्थसहाय्य उपलब्ध होते. लवकरच आम्ही या योजनेच्या संदर्भात मेळावा आयोजित करणार आहोत, असेही आमदार भातकळकर म्हणाले.

प्रारंभी पालकमंत्री लोढा यांचा सत्कार आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार भातखळकर यांचा सत्कार कौशल्य विकास अधिकारी श्री. पाठक यांच्या हस्ते करण्यात आला. या रोजगार मेळाव्यासाठी विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. हजारो युवक युवतींनी या मेळाव्याचा लाभ घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button