बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

मनोरंजन क्षेत्रात ‘इज ऑफ डुईंग बिजनेस’ च्या माध्यमातून व्यवस्था निर्माण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मनोरंजन क्षेत्रात ‘इज ऑफ डुईंग बिजनेस’ च्या माध्यमातून व्यवस्था निर्माण करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 30 : मनोरंजन क्षेत्रात ‘इज ऑफ डुईंग बिजनेस’ च्या माध्यमातून चित्रपट निर्मितीसाठी लागणाऱ्या सर्व बाबींची व्यवस्था निर्माण करण्यावर भर देणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.बॅालिवूड चित्रपट सृष्टीतील नामांकित 67 वा ‘फिल्मफेअर’ पुरस्कार सोहळा वांद्रे येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे सांस्कृतिक विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, अमृता फडणवीस यांच्यासह सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार, रसिकप्रेक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी व मनोरंजनाची राजधानी म्हणून ओळखली जाते, याचा अभिमान आहे. जगभरात हिन्दी चित्रपटसृष्टीचा नावलौकीक आहे. मात्र, आता मराठी, तेलगु, तमिळ अशा देशांतल्या विविध प्रादेशिक चित्रपटसृष्टीदेखील मोठ्या प्रमाणात यश प्राप्त करीत आहेत. मनोरंजन क्षेत्र बदलत्या नव्या युगातून पुढे जात आहे. कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणारे देखील हे क्षेत्र आहे. ‘इज ऑफ डुईंग बिजनेस’ च्या माध्यमातून चित्रपट निर्मितीसाठी लागणाऱ्या सर्व बाबींची व्यवस्था निर्माण करण्यावर भर देणार असून नवीन सरकार सर्वसामान्यांबरोबर चित्रपटसृष्टीचे देखील आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

दादासाहेब फाळके यांचे चित्रपट क्षेत्रातील योगदान विषद करून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मनोरंजन क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर प्राप्ती होते. या क्षेत्राला चांगल्या सुविधा देण्यासाठी आगामी काळात सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल. मुंबईत असलेली चित्रनगरी येत्या काळात अधिक प्रगती करेल. देशात जीएसटी कायदा अस्तित्वात आल्यापासून चित्रनगरीच्या माध्यमातून देशाला आणि राज्याला मोठ्या प्रमाणात जीएसटी प्राप्त झाला. आगामी काळात देशाच्या आणि राज्याच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या चित्रनगरीच्या व्यवसायात मोठी वाढ होईल. चित्रपट निर्मितीसाठी अनेकवेळा परदेशात जावे लागते, अशा चित्रपटांची निर्मिती देशात आणि महाराष्ट्रात होईल यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.यावेळी बॅालिवूड चित्रपट जगतात आपल्या कामाचा ठसा उमटवणारे चित्रपट दिग्दर्शक व निर्माते सुभाष घई यांना ‘फिल्मफेअर’चा जीवनगौरव पुरस्कार उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button