राज्यात समान नागरी कायदा करण्यासाठी तात्काळ समिती गठन करावी – आमदार भातखळकर यांची मागणी
राज्यात समान नागरी कायदा करण्यासाठी तात्काळ समिती गठन करावी - आमदार भातखळकर यांची मागणी
मुंबई, दि. 10 जानेवारी (प्रतिनिधी)
राज्यात समान नागरी कायदा करण्यासाठी तात्काळ समिती गठन करावी अशी मागणी भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्राद्वारे केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने समान नागरी कायदा करण्याचे अधिकार राज्यांना आहेत असा निर्णय उत्तराखंड सरकारने नेमलेल्या समितीच्या विरोधात दाखल याचिकेवर दिला आहे. त्या संदर्भानुसार महाराष्ट्र राज्यात ही समान नागरी कायदा आणण्यासाठी समिती गठन करण्यात यावी असे आ. भातखळकर यांनी पत्रात म्हटले आहे. मा. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी तिहेरी तलाक रद्द करुन मुस्लिम भगीनींना खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे, त्यानुसार राज्यात समान नागरी कायदा आणल्यास खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता होईल असेही आ. भातखळकर म्हणाले आहेत.
मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याबाबत सकारात्मक विचार करतील असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.