कुर्ल्यातील प्रसिद्ध असलेल्या श्री जागृत विनायक मंदिरात अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने भाविकांनी प्रचंड गर्दी करत श्री गणरायाचे दर्शन घेतले. सकाळी 5 वाजता मंदिरात भाविकांनी दर्शन घेण्यास सुरुवात केली.
यावेळी स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, प्रविणा मोरजकर, मनीष मोरजकर, रियाझ मुल्ला यांनी दर्शन घेतले. या प्रसंगी या मंदिराचे विश्वस्त रत्नाकर शेट्टी, बापू तेरेखोलकर, किशोर मेहता, दिवाकर शेट्टी, सुभाष गुप्ता, धनंजय यादव, दिलीप मोटवानी, विजय कापशीकर, सभासद चेतन मंगेश कोरगांवकर यांनी चोख व्यवस्था केली. कुर्ल्यात या मंदिराची स्थापना 1960 ला करण्यात आली होती. श्री सिद्धिविनायक मंदिरानंतर कुर्ल्यातील श्री जागृत विनायक मंदिरांकडे भाविकांचा ओढ असते.