उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मुंबईमधील भाषणातील मुद्दे
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मुंबईमधील भाषणातील मुद्दे
मुंबई –
– उत्तर प्रदेशातले रस्ते चांगल्या दर्जाचे झालेत
– गोरखपूर वरुन १४ ठिकाणी फ्लाईट कनेक्टिव्हिटी आहे, सोबत ९ विमानतळे आहेत
– आम्ही आजमगड, अलिगड, सहारणपूर, चित्रकूट, श्रावस्तीमध्ये पण विमानतळ बनवतोय
– आशियातला सर्वात मोठा एअरपोर्ट देखील उत्तर प्रदेशात बनवतोय
योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश
– यापूर्वी कोणी आझमगडमध्ये विमानतळाचा विचार करू शकत होता का? मुंबईचे लोक आझमगडच्या नावाला घाबरत होते, आज आझमगडमध्ये विमानतळ बनत आहे, तिथले खासदार आता मायानगरीचा भाग आहेत
योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश
– संकटाच्या काळात कोण आपल्यासोबत उभा असतो तो कसोटीचा काळ असतो
– कोव्हिडमध्ये आम्ही प्रवाशांसाठी आपले दरवाजे उघडलेत
– ४० लाख प्रवासी आमच्याकडे आले होते
– मला आनंद आहे प्रत्येक उत्तर प्रदेशवासीनं अनुशासन पाळले
– आम्ही संकटकाळी मदत करतो, पळून जात नाही
– उत्तर प्रदेशच्या लोकांसमोर आपण उत्तर प्रदेशचे आहोत हे सांगायला संकोच व्हायचा मात्र आता परिस्थिती बदलली आहे
– केंद्राच्या मदतीनं हे सर्व शक्य झालं आहे