Uncategorizedमहाराष्ट्रमुंबई
Trending

एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्याविरुद्ध प्राप्त तक्रारींची माहिती देण्यास नकार

एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्याविरुद्ध प्राप्त तक्रारींची माहिती देण्यास नकार

आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे प्रसिद्धी झोतात आलेले एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्याविरुद्ध प्राप्त तक्रारींची माहिती देण्यास एनसीबीने नकार दिला आहे. एनसीबीने माहितीचा अधिकार कायदा 2005चे कलम 24 चा हवाला देत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस माहिती नाकारली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एनसीबीकडे अर्ज करत उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्या विरोधात प्राप्त झालेल्या विविध तक्रारींबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल तसेच विविध तक्रारींची सद्यस्थितीची मागणी केली होती. एनसीबीने माहितीचा अधिकार कायदा 2005 चे कलम 24 अंतर्गत माहिती नाकारली आहे. अनिल गलगली याविरोधात प्रथम अपील दाखल केले आहे.

अनिल गलगली यांचे म्हणणे आहे की भ्रष्टाचार आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या आरोपाशी संबंधित माहिती आरटीआय कायदा, 2005 अंतर्गत समाविष्ट आहे आणि कोणत्याही एजन्सीला यातून सुट नाही आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे की जर मागितलेली माहिती भ्रष्टाचार आणि मानवी हक्क उल्लंघनाच्या आरोपाशी संबंधित असेल तर ती वगळण्याच्या कलमातून सूट दिली जाईल, याचा उल्लेख करत गलगली यांनी अशी माहिती सार्वजनिक करून वेबसाइटवर अपलोड करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले जेणेकरून ही माहिती नागरिकांना सहज उपलब्ध होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button