महाराष्ट्रमुंबई
Trending

बेस्टच्या विद्युत विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात बेस्ट मुख्यालयावर ‘आप’चा धडक मोर्चा

बेस्टच्या विद्युत विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात बेस्ट मुख्यालयावर 'आप'चा धडक मोर्चा

बेस्टच्या विद्युत विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात बेस्ट मुख्यालयावर आम आदमी पार्टीने धडक मोर्चा काढला. मुंबईसहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वीज कंपन्यांकडून सर्वसामान्य जनतेची लूट असा आरोप करत हा मोर्चा काढण्यात आला. काही दिवसांपूर्वी बेस्टच्या विद्युत विभागाकडून बेस्टच्या वीज ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा अनामत शुल्क भरण्याचे पत्र आले होते. एकीकडे विजेचे दर वाढत आहेत आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम भरण्यास सांगणे ही एक प्रकारे ग्राहकांची लूट आहे. या विरोधात कुलाबा येथील बेस्ट मुख्यालयासमोर आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा मुख्यालयावर धडकला. आम आदमी पक्षाचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button