महाराष्ट्रमुंबई

हॉटेल मध्ये दोघांना जबर मारहाण, घटना सिसिटीव्ही मध्ये कैद

हॉटेल मध्ये दोघांना जबर मारहाण, घटना सिसिटीव्ही मध्ये कैद

नवी मुंबईतील क्वालीटी ऑफ पंजाब हॉटेल मध्ये बुधवारी रात्री झालेल्या तुफान हाणामारीची घटना सिसिटीव्ही मध्ये कैद झालेय. हॉटेल मध्ये जेवायला बसलेल्या दोघांसोबत त्याच हॉटेल मध्ये जेवायला बसलेल्या 10 ते 12 जणांचा शुल्लक गोष्टीवरून वाद झाला. या वादाचे रूपांतर जोरदार हाणामारीत झालेय. 12 जणांनी मिळून दोघांना जबर मारहाण केलेय. हॉटेल मधील खुर्च्या,जेवणाच्या प्लेट आणि बीयरच्या बाटल्या मारत या दोघांना मारहाण करण्यात आलेय. या मारहाणीत दोघेजण गंभीर जखमी झाले असून आरोपीनी फिर्यादीच्या गळ्यातील चैन आणि मोबाईल देखील लंपास केलेत. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सर्व 12 आरोपीचा शोध घेतायत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button