क्राईमनाशिकबातम्यामहाराष्ट्र

म्हसरुळ शिवारात आश्रमाच्या संचालकाने केला शाळकरी मुलींवर अत्याचार

म्हसरुळ शिवारात आश्रमाच्या संचालकाने केला शाळकरी मुलींवर अत्याचार

नाशिक मधील म्हसरूळ शिवारातील ज्ञानदीप गुरुकुल आधाराश्रमात चौदा वर्षांच्या शाळकरी मुलीवर संचालकाकडून अत्याचार केल्याची घटना गुरुवारी (दि.2३) उघडकीस आली होती. या प्रकरणात पोलिसांनी आणखी मुलींचा जबाब नोंदवला असून, आणखी पाच मुलींच्या जबाबातून लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. संशयित आरोपी हर्षल मोरे याने तक्रारदार मुलीसह आणखी पाच मुलींवर अत्याचार केल्याची बाब मुलींच्या जबाबातून समोर आली. यात संशयित आरोपी हर्षल मोरे याच्या अडचणींमध्ये झाली असून, त्याच्यावर पॉक्सो आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट लावून गुन्हा दाखल करण्यात आला. या संशयिताने मुलींना आश्रमातून काढून टाकण्याची धमकी देत अत्याचार केला आहे. सध्या तरी या प्रकरणात एकच आरोपी असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या आश्रमाला फक्त चॅरिटेबल ट्रस्टची परवानगी होती, इतर परवानगी नसल्याचे पोलीस तपासात आढळले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button