बडनेरा येथे चायना मांजाने युवकाचा गळा कापला ;युवकावर रुग्णालयात उपचार सुरू
बडनेरा येथे चायना मांजाने युवकाचा गळा कापला ;युवकावर रुग्णालयात उपचार सुरू
पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चायना मांजाने अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे एका ३६वर्षीय युवकाचा गळा कापला गेल्याने त्याला अमरावती च्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
डॉ. श्रीकांत महल्ले व त्यांच्या चमूनी तातडीने उपचार केल्याने रमेश धुर्वे चा जीव वाचला मात्र यात मानेला गंभीर इजा झाल्याने त्याला मानेच्या स्क्रीनच्या आत मध्ये तब्बल 50 टाके तर मानेवर 30 टाके पडलेत.
रमेश धुर्वे हा युवक दुचाकीने बडनेरा इथून अमरावती शहरात येत होता,दरम्यान रस्त्यावर दुचाकी चालवत असतांना त्याच्या मानेवर चायना मांजाने त्याचा गळा कापला गेला,सध्या युवकांची जिल्हा सामान्य रुग्णालयात मानेवर त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली यात त्याची प्रकृती स्थिर असून अतीदक्षता कक्षात त्याचेवर उपचार सुरू आहे, मात्र बंदी घालण्यात आलेल्या चायना मांजाची विक्री सर्रास होताना दिसते. त्यामुळे कुठंतरी यावर आवर घालावा अशी मागणी पुढं येत आहे.