मुंबई
आजकाल भारत जोडो सुरू आहे. ‘बेगाने शादी अब्दुल्ला दिवाना’ यानुसार आदित्य ठाकरेचा प्रचार सुरू आहे. हे भारतीय उखाडो अभियान आहे. आदित्य ठाकरे राहुल गांधींचा हातात हातात घेऊन चालत आहे. पण इतिहास तुम्हाला प्रश्न विचारणार, अशा शब्दांत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी आज जागर सभेत हल्लाबोल केला.
मागाठाणे येथे जागर मुंबईची सभा झाली. सभेला खा. गोपाळ शेट्टी, विधान परिषदेचे गटनेते प्रविण दरेकर, माजी नगरसेवक प्रकाश दरेकर यांच्यासह उत्तर मुंबईतील पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार ॲड. आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांनी भारत जोडोमध्ये घेतलेल्या सहभागावर प्रश्न उपस्थितीत करताना ते म्हणाले की, ज्या काँग्रेसने राम जन्मभूमी मंदिरसंबंधी कोर्ट केसमध्ये राम जन्मला नाही, रामाची गादी नव्हती ,रामाचा कोणता इतिहास नव्हता, भगवान राम कल्पोकल्पित आहे असे म्हणणाऱ्या काँग्रेसचा हात आदित्य ठाकरे यांनी पकडला आहे. रामसेतू बांधलाच नाही असे म्हणणाऱ्या त्या काँग्रेसबरोबर हातात हात घालून तुम्ही फिरताय इतिहास तुम्हाला प्रश्न विचारेल. कुराणमध्ये जिहाद नाही अशी शिवराज पाटील यांनी मांडणी केली. काँग्रेस गीता जिहाद आहे म्हणतो. त्या काँग्रेसचा हात हातात घेतला. देशातील संपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे असे म्हणणाऱ्या काँग्रेसचा हात हातात घेवून आदित्य ठाकरे चालले आहेत. सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न विचारणाऱ्या काँग्रेसचा हात हातात घेऊन आदित्य ठाकरे चालले आहेत. तो शर्जील उस्मानी महाराष्ट्रात येवून हिंदूचे डोकं सडक आहे असे भाषण करणाऱ्यांसोबत असणाऱ्या राहुल गांधीचा हात हातात घेवून तुम्ही चालत आहात म्हणून इतिहास तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. औरंगजेबाच्या अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचे काम उद्धव ठाकरे यांची शिवसेना करत आहे. हिंदू आणि नव हिंदू अशी मांडणी केली जात आहे. जागर त्याच्या विरोधात आहे. हिंदू मराठी आणि मुस्लिम मते भारतीय जनता पार्टीला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ॲड. आशिष शेलार म्हणाले, मातोश्रीच्या अंगणातून सुरू केलेला जागर मुंबईच्या गल्ली गल्लीमध्ये पोहोचला आहे. मुंबईला वाचविण्यासाठी जागर मुंबईचा कार्यक्रम आहे. हा जागर मुंबईकरांची शक्ती जागृत करून त्यांना जागृत करण्याचा आहे. २२ ऑक्टोबरला सामनामध्ये मराठी मुस्लिमांचे आम्ही स्वागत करत आहोत असे लिहिले गेले. आम्ही कुठल्याही धर्माच्या, जातीच्या विरोधात नाही आहोत. आम्ही ‘सबका साथ सबका विकास’ आहोत. तुष्टीकरण्याच्या आणि लांगुलचालनाच्या विरोधात आम्ही आहोत. मुस्लिम मराठी मांडणी केली जात आहे मग मराठी गुजरातीला विरोध का? मराठी जैनच्या विरोधात उभे का राहता? मराठी उत्तर भारतीय तुम्हाला का चालत नाहीत? मराठी हिंदू या शब्दांशी तुमचे वैर का आहे? असा सवाल ॲड. आशिष शेलार यांनी केला. प्रत्येक वार्डात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून मराठी आणि मुस्लिम मताचं गणित जुळवलं जात आहे. सलग २५ वर्ष राज्य करून तुम्हाला जाती धर्माच्या आधारावर मतं मागण्याची वेळ का आली? केलेल्या कामाच्या आधारावर मतं मागा? सांगा तुम्ही किती प्रकल्प केले, रस्ते बांधले, किती शाळा बांधल्या? यातील काहीही त्यांना सांगता येत नाही. मुंबई महापालिकेची सत्ता हातातून जात असल्याने शेवटचा डाव हा रडीचा म्हणजेच कलीचा डाव खेळला जात आहे. जाती आणि धर्माच्या आधारावर मतं
मागण्याचा कार्यक्रम हा अजेंडा उद्धव यांच्या शिवसेनेचा आहे. तेच आम्ही जागर यात्रेतून मांडत आहोत. मराठी आणि मुस्लिमांना फसवण्याचे काम सुरू आहे. हिंदुत फूट पाडण्याचे काम सुरू आहे ते कधीही यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा ॲड. आशिष शेलार यांनी दिला.
आ. प्रवीण दरेकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाचा विचार सोडला. दाऊदशी व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकला मंत्री मंडळात स्थान दिले. मालवणीला हिंदूंवर अत्याचार होतात. याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण केले जाते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अफजलखानाच्या कबरीवरील अतिक्रमण हटवले. हा उद्धव ठाकरे आणि सध्याच्या सरकारमधील फरक आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व कधीच सोडले आहे. २५ वर्षे शिवसेनेने मुंबई महापालिकेची सत्ता स्वतःचे घर भरण्यासाठी केले. मातोश्री २, मातोश्री ३ होईल पण मराठी माणूस मुंबई बाहेर जातोय. मराठी माणसाला हक्काचे घर मिळाले नाही. मराठी माणसांना न्याय देण्याचे काम भारतीय जनता पार्टी करेल. मुंबईतील भाडेकरूंना एक वर्षाचे भाडे देवू. येणाऱ्या पाच वर्षांत भारतीय जनता पार्टी मुंबईचे चित्र बदलणार असा विश्वास आ. प्रविण दरेकर यांनी दिला.
खा. गोपाळ शेट्टी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्यांना हक्काचे घर देण्याचे वचन दिले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात झोपडपट्टीवासीयांच्या समस्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यांच्या पापाने महविकास आघडी सरकार गेले असेही ते म्हणाले.