महाराष्ट्रमुंबई
Trending

बाळासाहेबांच्या विचारांचा एक मावळा मुख्यमंत्र्यांच्या रूपाने जन्माला आला – नरेश म्हस्के

बाळासाहेबांच्या विचारांचा एक मावळा मुख्यमंत्र्यांच्या रूपाने जन्माला आला - नरेश म्हस्के

जो अफजल खान आपल्या देशाच्या विरोधात महाराजांना मारण्यासाठी आला होता. पण महाराजांनी त्याचा कोथळाच बाहेर काढला.
तरी सुद्धा त्याच्या वधानंतर त्याचा सन्मान करत त्याच्या कबरीला थोडी जागा दिली.

मात्र काही काळाने काही लोकांनी आपलं स्तोम माजवत तेथे उरूस सुरू झाले आणि महाल निर्माण झालं.
अनेक संघटनांनी ते बेकायदेशीर काम पडावं अशी  मागणी केली होती. परंतु ते पडण्याची कोणाची हिम्मत झाली नाही.

अडीच वर्षां पूर्वी हिंदुत्ववादी  विचारांचं सरकार आलं. परंतु ते स्वतःला सेक्युलर समजू लागले. आणि खुर्चीच्या भीतीने ते हे बेकायदेशीर बांधकाम पाडू शकले नाहीत.

बाळासाहेबांच्या विचारांचा मुख्यमंत्री आला खऱ्या अर्थाने
एक मराठा, एक मावळा, बाळासाहेबांचा खरा चेला मुख्यमंत्री झाला.
आणि ते बेकायदेशीर बांधकाम पाडलं, हे पाहून
खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना आनंद झाला असता.
बाळासाहेबांना, आनंद दिघे साहेबांना आनंद झाला असता की माझ्या शिष्याने हे काम केलं.
हिरवं अजगर जे वाढलं होतं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढून टाकलं आहे.
एका मावळ्याने हिम्मत ही केलेली आहे. असे अनेक अफजलखान जरी आले ना तरी त्यांचे कोथळे बाहेर काढू.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button