डोंबिवलीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
डोंबिवलीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कल्याण
ANC : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. शशांक माणगावकर असे त्या वक्तीचे नाव असून डोबिवली पश्चिम उमेशनगर परिसराचा रहिवाशी आहे. शशांकने 4 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री शेतात बसून रोपटे लावत असलेला फोटो यावर पेरताय की उपाय…
फोटोला काय कॅप्शन दयाल ? अशा आशयाची बदनामीकारक मजकुराची फेसबुकवर पोस्ट तयार करून प्रसारीत केली. तसेच उपमुख्यमंत्री यांचा हॉरर शो मधील मुलांसोबत असलेला फोटो घेवुन त्यावर “हिंदु संस्कृतीचा वारसा पुढे घेवुन जाताना तडफडणवीस अरे मेकअपची गरज नव्हती.” अशा आशयाचा मजकुर तयार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट फेसबुक वर व्हायरल केल्यानंतर डोंबिवलीतील संतोष सिताराम चव्हाण यांही शिवसैनिकांच्या भावना दुखावुन दोन गटात राजकीय तेढ निर्माण होवुन त्यापासून दंगा भडकण्याची व गंभीर स्वरूपाचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवत डोंबिवलीच्या विष्णुनगर पोलीस ठाण्यात भादवी कलम ३३२/ २०२२ ,१५३(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी या गुन्ह्याची गांभीरता घेत आरोपीला बेड्या ठोकत पुढची कारवाई सुरू केली आहे.
तर दुसरीकडे मिळालेल्या माहितीनुसार शशांक हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यकर्ता असून बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे गटाविरोधात ही पोस्ट केल्याने ठाकरे व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
BYTE पंढरीनाथ भालेराव ( सिनियर पी आय विष्णुनागर पोलीस ठाणे )