डोंबिवलीत नळावाटे गटारीचे पाणी ; समता नगर परिसरातील नागरिक त्रस्त
डोंबिवलीत नळावाटे गटारीचे पाणी ; समता नगर परिसरातील नागरिक त्रस्त
डोंबिवलीत नळांच्या पाण्यातून थेट गटारीचे पाणी येत असल्याने महिला व स्थानिक नागरिक त्रस्त असून दूषित पाणी पिऊन मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक ,लहान मुल आजारी पडत असून महानगरपालिकेला तक्रार देऊन पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने संतप्त नागरिकांनी रस्ता रोको करत उग्र आंदोलन करण्याचा इशारा पालिकेला दिला आहे . मात्र लिकेज मुळे दूषित पाणी येत असून लिकेज शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचा पालिकेचा दावा. डोंबिवली समता नगर परिसरातील अनेक भागांतील एक महिन्या असून या भागातील अनेक नळांना गटारीचे पाणी येत आहे मात्र पर्याय नसल्याने येथील रहिवासी हेच पाणी पीत असून हे पाणी पिल्यामुळे नागरिकांना विविध आजारांचा त्रास सहन करावा लागत आहे अनेक वेळा महानगरपालिकेला तक्रार देऊन पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात लहान मुले व नागरिक आजारी पडत असल्याने आता संतप्त नागरिकांनी आम्हाला स्वच्छ पाणी मिळणार कधी असा सवाल करत लवकरच रस्ता रोको करत उग्र आंदोलन करण्याचा इशारा पालिकेला दिला आहे . तर या बाबत पालिका आयुक्तांनी पाईपलाईन लिकेज मुळे या परिसरात गडूळ पाणी येत असून लिकेच शोधून युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिला आहे