बातम्यामहाराष्ट्रमुंबई

एखाद्याशी आपण स्पर्धा करायला जातो तेव्हा आपली योग्यता तपासली पाहिजे – नरेश मस्के माजी महापौर

एखाद्याशी आपण स्पर्धा करायला जातो तेव्हा आपली योग्यता तपासली पाहिजे - नरेश मस्के माजी महापौर

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिल्लक सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सिल्लोड मधील त्यांची नियोजित सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
या नियोजित सभेपासून रणछोडदास कुणाला घाबरून पळाले..? असा सवाल बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी विचारला आहे.
एखाद्याशी स्पर्धा करायला जातो तेव्हा आपली योग्यता तपासली पाहिजे. असा टोला माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना नरेश मस्के यांनी लगावला.
खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहे आणि आपलं भाषण ऐकायला कुणीच येणार नाही अशी भीती वाटल्यामुळे आदित्य ठाकरे रणछोडदास झाले.
का आमच्या एका खासदारांचा आपण धसका घेतलात..?असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
आम्हाला सांगितले असते तर आम्ही तुम्हाला व्यासपीठ आणि खुर्च्या उपलब्ध करून दिल्या असत्या असा सल्ला म्हस्के यांनी आदित्य याना दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button