भाऊबीजेला दागिन्यांची बॅग झाली गहाळ, ठाणेनगर पोलिसांनी दिली शोधून; महिलेने मानले आभार
भाऊबीजेला दागिन्यांची बॅग झाली गहाळ, ठाणेनगर पोलिसांनी दिली शोधून; महिलेने मानले आभार
भाऊबीज निमित्त भावाला औक्षण करण्यासाठी ठाण्यात आलेल्या बहिणीचे दागिनेच हरविल्याने ऐन दिवाळीत दुःखाचे सावट पसरले होते परंतु ठाणेनगर पोलिसांच्या कर्तव्यतत्परते मुळे दागिने असलेली बॅग केवळ काही तासांत शोधून परत करण्यात आल्याने पिडीत कुटुंबाने पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. दिनांक 26 ऑक्टोबर रोजी भाऊबीज असल्याने आपल्या भावाला औक्षण करायला रुपाली पवार या ठाण्यातील वैतीवाडी येथे आल्या होत्या. भाऊबीज झाल्यावर परतताना प्रवासात जोखीम नको म्हणून त्यांनी स्वतःच्या अंगावरील जवळपास नऊ तोळे सोन्याचे दागिने सोबतच्या बॅगेत काढून ठेवले. रिक्षातून ठाणे रेल्वे स्थानकात उतरल्यावर आपण आपली बॅग रिक्षातच विसरल्याने त्यांच्या लक्षात आले व त्यांना एकच धक्का बसला. त्यांनी स्थानाकबाहेर येत रिक्षावाल्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु रिक्षावाला तिथे आढळून आला नाही. अत्यंत विमनस्क अवस्थेत पवार दांपत्याने त्वरित ठाणे नगर पोलिस ठाणे गाठले व आपली बॅग हरवल्याची तक्रार दिली. ठाणेनगर पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते यांच्या नेतृत्वाखाली टीम तयार करून वैती वाडी ते ठाणे स्थानकापर्यंतचे सीसीटीव्ही फोटो चेक करून पाच ते सहा रिक्षावाल्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेज अत्यंत अस्पष्ट असल्याने कोणतेही पुरावे सापडत नसताना देखील पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत राजेश मिश्रा याच्या तिघा येतील घरातून सदर बॅग हस्तगत केली. पोलिसांनी अत्यंत सिताफिने तपास करत आपली बॅग मिळवून दिल्याबद्दल पीडित रूपाली पवार यांनी पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.