Uncategorized
एसटी महामंडळात कायमस्वरूपी नियुक्ती मिळवण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण
एसटी महामंडळात कायमस्वरूपी नियुक्ती मिळवण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळात कंत्राटी चालकांची नेमणूक करण्यात आली होती. लालपरी सुरळीतपणे चालण्यासाठी हे 800 कंत्राटी एसटी कर्मचारी काम करत होते. परंतु एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यानंतर कोणतीही पूर्वकल्पना न देता आम्हाला अचानक कामावरून काढण्यात आले. यामुळे आम्हा कंत्राटी चालक वाहकांची फरफट होते आहे आणि पोटाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, असे एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. सदर परिस्थितीचा विचार करून आम्हाला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये कायमस्वरूपी कामावर रुजू करावे, ही मुख्य मागणी घेऊन या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात आमरण उपोषण छेडले आहे.
बाईट – किशोर राठोड, एसटी कंत्राटी चालक
बाईट – त्रिगुण पवार, एसटी कंत्राटी चालक